Join us

अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांच्यात मजबूत बाँडिंग; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 14:38 IST

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक कुटुंब म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांचं आहे. बच्चन कुटुंबातील सदस्य कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकतेच अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.  ज्यात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील मजबूत बॉन्डिंगची झलक पाहायला मिळत आहे. 

मुंबईत झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला संपूर्ण बच्चन कुटुंब हजर राहिले.  या कार्यक्रमातून समोर आलेल्या अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या एका व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली आहेत. व्हिडीओमध्ये दिसते की, अभिषेक बच्चन हा अमिताभ यांचा सूट व्यवस्थित करताना दिसत आहे. यानंतर दोघांमध्ये संभाषण होते.

बाप-लेकामधील हे प्रेम पाहून चाहतेही खूश झाले आहेत. लुकबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे काळ्या रंगाच्या पँट सूटमध्ये दिसले. ग्रँड प्रीमियरमध्ये अमिताभ आणि अभिषेक व्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांनीही हजेरी लावली होती यासोबतच अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदाही मुलगा अगस्त नंदासाठी कार्यक्रमात पोहचली होती. संपूर्ण बच्चन कुटुंबाने एकत्र पोज दिल्या, ज्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

झोया अख्तरचा चित्रपट 'द आर्चीज' उद्या म्हणजेच 7 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. प्रत्येकजण या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. या चित्रपटाद्वारे 3 स्टार किड्स म्हणजेच शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. 

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटी