Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'मध्ये झाली 'या' अभिनेत्याची एंट्री, साकारणार व्हिलनची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 16:15 IST

सिनेमात क्रिती सॅनॉन, जॅकलिन फर्नांडिस आणि अर्शद वारसी मुख्य भूमिकेत आहेत.

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार सध्या राजस्थानातील जैसलमेरमध्ये आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी करतो आहे. या सिनेमातील त्याचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. या चित्रपटात क्रिती सॅनॉन, जॅकलिन फर्नांडिस आणि अर्शद वारसी मुख्य भूमिकेत आहेत. आता या सिनेमात व्हिलनची एंट्री झाली आहे. 

'गुलाल', 'गोलियां की रासलीला रामलीला', 'रक्षा चरित्र', 'लक्ष्या' आणि 'मॉम' सारख्या चित्रपटात काम करणारा अभिनेता अभिमन्यू सिंह 'बच्चन पांडे'मध्ये व्हिलनची भूमिका साकारणार  आहे. अभिमन्युने यापूर्वी अक्षयसोबत 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' आणि सूर्यवंशी या चित्रपटात काम केले आहे. अभिमन्यूने हिंदी चित्रपटांपेक्षा दक्षिणेकडील चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तेथे तो बराच लोकप्रिय आहेत.

अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे' ची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली असून त्याचे दिग्दर्शन फरहाद समाजी करत आहेत. या सिनेमात अक्षय कुमार एका अभिनेता बनू इच्छिणाऱ्या एका गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयच्या मित्राच्या भूमिकेत अर्शद वारसी दिसणार आहे तर क्रिती सनॉन पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट 26 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होईल.

टॅग्स :अक्षय कुमारक्रिती सनॉन