Join us

'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये अभिमन्यू आणि अक्षराने लग्नात केलं असं काही, सर्वत्र होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 18:36 IST

Yeh Rishta Kya Kahalata Hai: 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिका अभि - रा (अभिमन्यू आणि अक्षरा) च्या भव्य लग्नामुळे चर्चेत आली आहे

स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kahalata Hai) गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या ही मालिका अभि - रा (अभिमन्यू आणि अक्षरा) च्या भव्य लग्नामुळे चर्चेत आली आहे आणि लग्नाच्या संदर्भात टेलिव्हिजन इंडस्ट्रीत एक नवीन इतिहास रचला आहे. मालिकेत अभिमन्यू आणि अक्षराच्या लग्नाच्या सुवर्ण प्रसंगी, एक वधू म्हणजेच अक्षरा, अभिमन्यूच्या कपाळावर 'कुंकु' लावताना दिसणार आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत खूप नाटकं आणि चढ-उतार पाहिल्यानंतर अखेर प्रेक्षक त्यांच्या आवडत्या कलाकारांना एकत्र पाहत आहेत. जिथे अक्षरा आणि अभिमन्यू एकामेकांशी गाठ बांधणार आहेत. सिंदूर हे लग्नात नेहमीच वधूला लावले जाते. पण जसेजसे आपण आधुनिक युगाकडे वाटचाल करत आहोत तसेच 'ये रिश्ता क्या कहलाता है' या अभि - रा च्‍या लग्‍नात एक नवीन गोष्ट पाहायला मिळणार आहे. लग्नात अक्षरा, अभिमन्यूच्या कपाळावर 'कुंकु' लावताना दिसणार आहे.

प्रेक्षकांनी नेहमीच या शो ला कथेला वास्तवात वळवताना पाहिलं आहे, मग ती नायिक आणि अक्षराची कथा असो, कार्तिक आणि नायराची प्रेमकथा असो किंवा नव्या युगातील अक्षरा आणि अभिमन्यूची जोडी असो. अक्षरा आणि अभिमन्यूच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता है