Join us

'अब पठान की महफ़िल में आ जाओ'; शाहरुख खानच्या पोस्टनं वाढवली चाहत्यांची उत्कंठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 14:33 IST

Pathaan Movie Trailer : काही दिवसांपूर्वी पठाणच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली होती आणि आता पठाण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यासाठी चोवीस तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख(Shah Rukh Khan)चा आगामी चित्रपट पठाण (Pathaan Movie) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. या चित्रपटाच्या दीर्घ बहिष्कारानंतर पठाण चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तयारी पूर्ण झाली आहे. काही दिवसांपूर्वी पठाणच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली होती आणि आता पठाण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यासाठी चोवीस तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा अ‍ॅक्शन चित्रपट पठाणची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि ज्याच्या ट्रेलरचीही आतुरतेने चाहते वाट पाहत आहे, त्यानंतर प्रेक्षकांची ती प्रतीक्षा आता संपणार आहे. 

उद्या म्हणजेच १० जानेवारी २०२३ रोजी पठाण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी, बेशरम रंग आणि झूम जा ही पठाणमधील दोन्ही गाणी सकाळी ११ वाजता प्रदर्शित करण्यात आली. याशिवाय पठाणचा टीझरही सकाळी ११ वाजता रिलीज झाला होता आणि आता पठाण चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीजची वेळही सकाळी ११ वाजता आहे. म्हणजे उद्या सकाळी ११ वाजता पठाण चित्रपटाचा ट्रेलर पाहू शकणार आहोत. शाहरुख खानने आज पठाणच्या रिलीजची तारीख आणि वेळ ट्विट करून लिहिले, प्रतीक्षेसाठी आभारी आहे. अब पठान की महफ़िल में आ जाओ. पठाण चित्रपटाचा ट्रेलर उद्या सकाळी ११ वाजता रिलीज होणार आहे.

पठाणमधील बेशरम रंग हे गाणे समोर आल्यावर बराच वाद झाला होता, अशा परिस्थितीत पठाणचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतरही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या ट्रेलरमध्ये सलमान खानही दिसू शकतो, अशी चर्चा सध्या रंगली आहे. त्यामुळे पठाणच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानदीपिका पादुकोणजॉन अब्राहम