Join us

'नमुने'मध्ये निरंजन भेटणार आपल्या बालमित्राला, बालमित्राच्या भूमिकेत अास्ताद काळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 18:21 IST

शशी सारंगच्या भूमिकेतून अभिनेता आस्ताद काळे 'नमुने' या मालिकेत एन्ट्री करतो आहे.

ठळक मुद्दे'नमुने' मालिकेत आस्ताद दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत

सोनी सब वाहिनीवरील 'नमूने' मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या आठवड्यात 'नमूने'मध्‍ये प्रेक्षक निरंजनच्‍या अशाच एका मित्राला शशी सारंगला भेटतील. शशी सारंगच्या भूमिकेतून अभिनेता आस्ताद काळे या मालिकेत एन्ट्री करतो आहे.

'नमुने' मालिकेत एकेकाळी साधा-सरळ मुलगा असणारा शशी आता एक शायर बनला आहे. अचानक तो पुन्हा एकदा निरंजनच्‍या जीवनामध्‍ये येतो. शशी सर्व सुविधांनी युक्‍त वातावरणात जन्‍माला आला आहे आणि त्‍याचे मन खूप खरे आहे. बऱ्याच लोकांना वाटते की, एकतर तो नशेत आहे किंवा वेडपट आहे, कारण तो लोकांसोबत आपल्‍या शायराना अंदाजात बोलतो. शशी निरंजनला सांगतो की, आपल्‍या जीवनाचा प्रत्‍येक क्षण कसा जगला पाहिजे आणि त्‍याचा कशाप्रकारे आनंद घेतला पाहिजे. त्‍याबरोबरच, तो निरंजनला सांगतो की पुढची काळजी करत बसण्‍यापेक्षा त्‍याच्‍याकडे जे आहे त्‍याचा आनंद घेतला पाहिजे.शशी सारंगची भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता अास्‍ताद काळे पडद्यावर आपल्‍या प्रबळ भूमिकांकरिता ओळखला जातो आणि सोनी सबच्‍या 'नमूने'मध्‍ये आनंद पसरवण्‍याकरिता ते आले आहेत.याबद्दल आस्‍ताद काळे म्‍हणाला की, 'मी नेहमीच मराठी भूमिका साकारल्‍या आहेत. मात्र, हिंदी शोजमध्‍ये काम करण्याची संधी मला मिळाली नव्हती. सोनी सबच्‍या 'नमूने'सारख्‍या शोमध्‍ये भूमिका साकारणे माझ्यासाठी एक महत्‍त्‍वपूर्ण संधी आहे. निर्मात्या स्‍वप्‍ना वाघमारे जोशी यांच्यासोबत काम करणे नेहमीच माझ्यासाठी उत्‍कृष्‍ट अनुभव राहिला आहे आणि आता 'नमूने'मध्ये त्यांच्या सोबत काम करायला मिळणे हे माझे भाग्‍यच आहे. आशा करतो की, मी आपल्‍या चाहत्‍यांच्‍या अपेक्षा पूर्ण करेनआणि त्‍यांना खूश करण्‍यामध्‍ये यशस्‍वी होईन.'

टॅग्स :सोनी सबअस्ताद काळे