Join us

टीव्हीच्या या अभिनेत्रीचा असा सुरू होता पतिसह अंडर वॉटर स्लो मोशन लिपलॉक, VIDEO आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 15:42 IST

आशका आणि ब्रेंट रोमँटिक पोजमध्ये एकमेकांच्या जवळ आल्याचे पाहायला मिळत आहे.

आशका गोराडिया आणि  ब्रेंट गोबलसोबत योगा व्हिडीओमुळे सतत चर्चेत असते. नेहमीच हे हॉट कपल वेगवेगळ्या जागी त्यांचे योगासने करण्यात बिझी दिसतात. योगा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. आता त्यांचा आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिीडीओत त्यांचा  अंडरवॉटर रोमान्स पाहायला मिळत आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे.

आशका आणि ब्रेंट रोमँटिक पोजमध्ये एकमेकांच्या जवळ आल्याचे पाहायला मिळत आहे. समुद्रात दोघेही स्लो मोशनमध्ये लिपलॉक करताना दिसतायेत. या व्हिडीओला तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. "Let the kiss always be a #slowmotion moment... let it be a #kiss forever... Can’t help falling in love with you". 

२०१७ साली आशका विदेशी बॉयफ्रेंड ब्रेंट ग्लोबसोबत विवाहबंधनात अडकली. तेव्हापासून बऱ्याचदा ते दोघे सोशल मीडियावर योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.काही महिन्यांआधी  आशकाने टॉपलेस होत योगा करताना दिसली होती. हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करताच लाखोंनी पाहिला होता. तसेच आशकाच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

टॅग्स :आशका गोराडिया