Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दबक्या पावलांनी आली'चं फिमेल व्हर्जन ऐकलं का? आर्या आंबेकरने गायलं आहे गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 16:14 IST

'दबक्या पावलांनी आली' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. आता या गाण्याचं फिमेल व्हर्जन आलं आहे.

सोशल मीडियावर अनेक गाणी ट्रेण्ड होताना दिसतात. मध्यंतरी अशाच एका गाण्याने धुमाकूळ घातला होता. 'दबक्या पावलांनी आली' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्यावरील अनेक रील्सही सोशल मीडियावर फिरत होते. आता या गाण्याचं फिमेल व्हर्जन आलं आहे. लोकप्रिय गायिका आर्या आंबेकरने हे गाणं गायलं असून व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने ते प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

'दबक्या पावलांनी आली' गाण्याचे मूळ बोल 'चोरू चोरून' असे आहेत. 'फतवा' सिनेमातील हे गाणं असून या गाण्यातील "दबक्या पावलांनी आली माझी मालकीण झाली, एका वाघाची शिकार एका हरिणीने केली" हे कडवं व्हायरल झालं होतं. या गाण्याने अक्षरश: वेड लावलं होतं. आता या गाण्याच्या फिमेल व्हर्जनलाही तितकीच लोकप्रियता मिळत आहे. आर्या आंबेकरच्या सुमधूर आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. या गाण्याचं संगीत दिग्दर्शन संजीव-दर्शन यांनी केलं आहे. तर डॉ. विनायक पवार यांनी हे गाणं लिहिलं आहे. अभिनेता प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत हे कलाकार या गाण्यात आहेत. 

प्रतिक गौतम या गाण्याविषयी म्हणाला, “चोरू चोरून गाण्यातील एका वाघाची शिकार एका हरणीने केली, या शब्दामुळे हे गाणं संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. भारतातचं नाही तर अगदी जागतिक स्तरावर मला या गाण्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळाला. परदेशातून रील्स, मीम्स, कमेंट्सचा जणू पाऊस पडत होता. मला दररोज मेसेज यायचे की याचं फिमेल वर्जन आलं पाहिजे. तर मी विचार केला. या गोष्टीचं उत्तर द्यायला हवं. की वाघाची शिकार एका हरणीने केली तर आता पुढे कायं ? त्यामुळे मी ठरवलं की आपण याचं एक फिमेल वर्जन करूया. कारण जर हे गाणं इतकं हवहवंसं वाटत आहे तर माझी ही जबाबदारी आहे की हे गाणं नायिकेच्या बाजूने देखील मांडलं पाहिजे.” 

टॅग्स :आर्या आंबेकरमराठी चित्रपट