Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानच्या लेकीने शेअर केला नवऱ्यासोबतचा रोमँटिक फोटो; आयरा खानची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 17:08 IST

आयरा खान ३ जानेवारीला तिचा मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकली आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आयरा खान ३ जानेवारीला तिचा मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकली आहे. या दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. सध्या सोशल मीडियावर कमेंट्स करत दोघांचेही चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

आयरा खान सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच आयराने नवरा नुपूरसोबतचा रोमँटिक क्षण शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या फोटोत ते रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. फोटोमध्ये आयरा तिच्या पतीसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. आयराच्या हेअर बँडवर 'टू बी ब्राइड' असे लिहिले आहे. मात्र, तिने 'टू बी'वर रेखा मारल्या आणि फक्त 'ब्राइड' हा शब्द दिसत आहे.

आयरा आणि नुपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. नुपूर शिखरे हा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. तो अनेकवर्ष आमिर खान व सुष्मिता सेन यांचा पर्सनल ट्रेनर होता. याशिवाय नुपूर फिटनेस तज्ज्ञ व सल्लागार म्हणून देखील ओळखला जातो. 

२०२० मध्ये आयराने तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. या काळात नुपूरने तिला ट्रेनिंग दिलं होतं. त्यांची पहिली भेट जिममध्ये झाली होती. याच दरम्यान दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मे महिन्यात आयरा आणि नुपूरचा साखरपुडा पार पडला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

टॅग्स :इरा खानसेलिब्रिटीबॉलिवूडआमिर खान