Join us
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडचा हात हातात, सलमान -शाहरुखला घट्ट मिठी; आमिरच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला 'सितारे' अवतरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 09:47 IST

'सितारे जमीन पर'चं ग्रँड स्क्रीनिंग, कलाकारांची मांदियाळी

आमिर खानच्या (Aamir Khan) 'सितारे जमीन पर'चं स्क्रीनिंग काल पार पडलं. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी स्क्रीनिंगला हजेरी लावली. अगदी सलमान-शाहरुखही पोहोचले. दोघांसोबतही आमिरचं खास मित्रत्व दिसून आलं. स्क्रीनिंगवेळी विशेष लक्ष वेधलं ते आमिरची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटने (Gauri Spratt). आमिर गौरीचा हात हातात घेऊन मीडियासमोर आला. दोघांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिली. नंतर आमिरचा छोटा मुलगा आझादही त्यांच्यामध्ये उभा राहून पोज देत होता. 

आमिरने आपल्या ६० व्या वाढदिवशी आपल्या गर्लफ्रेंडची सर्वांना ओळख करुन दिली होती. ४६ वर्षीय गौरीला तो २ वर्षांपासून डेट करत आहे. नुकतंच 'सितारे जमीन पर'च्या स्क्रीनिंगला आमिर आपल्या पूर्व पत्नींसोबत नाही तर गौरीसोबत आला होता. तिचा हातात हात घेऊन तो कॅमेऱ्यासमोर आला. गौरीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती ज्यात ती सुंदर दिसत होती. तर आमिर पांढऱ्या रंगाच्या ड्रेसकोडमध्ये होता. नंतर आमिरचा लहान मुलगा आझादही आला. तिघांनी कॅमेऱ्यासमोर पोज दिली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

इतकंच नाही तर शाहरुख खान आणि सलमान खानही मित्राच्या स्क्रीनिंगसाठी पोहोचले होते.  शाहरुखने सिनेमातील मुलांसोबत धमाल केली. तर सलमानही चांगल्या मूडमध्ये पापाराझींसोबत गप्पा मारताना दिसला. 

'सितारे जमीन पर'च्या स्क्रीनिंगला अभिनेत्री रेखा, अभिनेता विकी कौशल, जिनिलिया डिसुजा, रितेश देशमुख, फराह खान, तमन्ना भाटिया, हिमेश रेशमिया यांनीही हजेरी लावली. आजपासून सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

टॅग्स :आमिर खानसलमान खानबॉलिवूड