Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळीच्या लेकीचा व्हिडीओ पहिल्यांदाच आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 19:04 IST

मिलिंद गवळीची मुलगी मिथिला फिटनेस ट्रेनर आहे.

छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते मालिकेने कमी कालावधीत लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्व कलाकार सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतात. या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि या माध्यमातून तो चाहत्यांना अपडेट देत असतो. आज त्याच्या लेकीचा वाढदिवस असून त्याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मिलिंद गवळीने मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने तिच्या बालपणापासून आतापर्यंतच्या फोटो आणि व्हिडीओंचा कोलाज केला आहे आणि तो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने व्हिडीओ शेअर करत लिहिले की वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू माझा प्राण आणि तू माझी सनशाइन आहेस.

मिलिंद गवळीच्या मुलीचे नाव मिथिला असून तिचे २०१८ मध्ये लग्न झाले आहे. ती फिटनेस ट्रेनर असून द बॅलन्स मिथ नावाचे तिचे इंस्टाग्राम अकाउंट आहे. जिथे ती फिटनेसचे धडे देताना दिसते आहे. 

मिलिंद गवळी यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. शूर आम्ही सरदार, हे खेळ नशिबाचे, आधार, वैभव लक्ष्मी, सून लाडकी सासरची, सासर माझे मंदिर यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच चंचल, वक्त से पहेले, हो सकता है यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये मिलिंद गवळी झळकले आहेत.

हिंदीमध्ये त्यांनी कॅम्पस, सीआयडी, आहट, कहानी तेरी मेरी यांसारख्या मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका केल्या आहेत.

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिका