Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेकीच्या साथीने स्वप्नपूर्तीचा आनंद! 'आई कुठे...' फेम मधुराणीने मुंबईत 'या' ठिकाणी घेतलं स्वतःचं घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 13:22 IST

आई कुठे काय करते फेम मधुराणी प्रभूलकरने मुंबईत स्वतःचं घर घेऊन स्वप्नपूर्तीचा आनंद घेतलाय

मुंबईत स्वतःचं घर होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. सामान्य माणसांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण मुंबईत घर घेण्याचं स्वप्न उराशी बाळगून असतात. यासाठी प्रचंड मेहनत करताना दिसतात. 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभूलकरने सुद्धा असंच स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलं. मधुराणीने मुंबईत स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर घर खरेदी केलंय. लाडक्या लेकीसोबत मधुराणीने नवीन घरात प्रवेश केला असून चाहत्यांना नवीन घराची झलकही दाखवलीय.

मधुराणीने घर घेऊन केली स्वप्नपूर्ती

मधुराणीने नवीन घराचा व्हिडीओ दाखवत लिहिलंय की, "मुंबईत आपलं स्वतः चं घर असावं, आणि तेही विलेपार्ले पूर्व इथेच. हे अनेक वर्षं हृदयाशी जपून ठेवलेलं स्वप्न...  ते स्वप्न पूर्ण होणं आणि लेकीच्या साथीनं त्या स्वप्नपूर्तीचा आंनद द्विगुणित होणं हे सगळंच अनमोल आहे.आज मन कृतज्ञतेने भरून आलंय. आई वडिलांचे आणि सर्व थोरा मोठ्यांचे कृपाशीर्वाद, गुरुकृपा, आणि असंख्य शुभचिंतकांच्या सदिच्छा निव्वळ ह्यामुळेच हे स्वप्न साकारलंय....!!! सविनय व सादर आभार."

मधुराणीने लेकीसोबत केला घरात प्रवेश

मधुराणीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केलाय. यात दिसतं की, नवीन घराच्या सोसायटीत लेकीसोबत मधुराणी प्रवेश करते. पुढे तिची लेक घराचा दरवाजा उघडते. आलिशान घर बघायला मिळतं. किचन, टॉयलेट, गॅलरी, हॉल अशा घराच्या प्रत्येक बाजूस मधुराणी लेकीसोबत फेरफटका मारते. मधुराणी आणि तिची लेक स्वराली दोघींच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट झळकलेला दिसतो. घराच्या समोर खेळायला ग्राऊंडही दिसतं. खिडकीबाहेर झाड आणि रस्ता पाहताना मधुराणी आणि तिची लेक एकमेकींशी गप्पा मारताना दिसतात. मुंबईत घर घेतल्यानिमित्त मधुराणीचं सर्वांनी अभिनंदन केलंय.

 

 

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरसुंदर गृहनियोजनआई कुठे काय करते मालिका