Join us

श्रद्धाचा 'जबरा फॅन', गुडघ्यावर बसून केलं प्रपोज; अभिनेत्रीनं जिकलं मनं पण नेटकऱ्यांनी घेतली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 20:32 IST

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या अभिनयाशिवाय सौंदर्य आणि फिटनेसमुळे देखील चर्चेत असतो.

Shraddha Kapoor Video : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या अभिनयाशिवाय सौंदर्य आणि फिटनेसमुळे देखील चर्चेत असतो. आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांच्या मनात जागा करणारी श्रद्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. श्रद्धाचे चाहते जगभरात आहेत, ती कुठेही गेली तरी ती तिच्या चाहत्यांना नक्कीच भेट देते. आता श्रद्धाचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये पाहायला मिळते की, श्रद्धा विमानतळावर स्पॉट झाली आणि तिला पाहताच एका चाहत्याने तिला प्रपोज केले. तिचा हा जबरा फॅन विमानतळावर श्रद्धाला फुलांचा गुच्छ घेऊन भेटायला आला होता. श्रद्धाच्या या व्हिडीओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. 

दरम्यान, चाहत्यांची लाडकी श्रद्धा विमानतळावर पांढरा शॉर्ट आणि फुल स्लीव्हज टॉप परिधान करून दिसली. श्रद्धाला पाहताच एका उत्साही चाहत्याला आपल्या लाडक्या अभिनेत्रीप्रती प्रेम व्यक्त करण्याचा मोह आवरला नाही. मग विमानतळावरच या चाहत्याने श्रद्धाला प्रपोज केले.

श्रद्धाचा 'जबरा फॅन'श्रद्धा तिच्या कारमधून खाली उतरताच तिचा एक चाहता गुलाबाचा पुष्पगुच्छ घेऊन तिच्याजवळ आला. त्याने गुडघ्यावर बसून अभिनेत्रीला प्रपोज केल्याचा क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला. श्रद्धाने देखील आपल्या चाहत्याला हस्तांदोलन करून पापाराझींसमोर तिच्या सुपरफॅनसोबत फोटो क्लिक केले. श्रद्धाच्या या व्हिडीओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. 

आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची सर्वत्र चर्चा आहे. याचाच दाखला देत एका युजरने लिहले, "अरे, हा लप्पू झिंगूसारखा मुलगा सचिन कुठून आला?." तर दुसऱ्याने म्हटले, "श्रद्धा खूप नम्र आणि फिट आहे."  याशिवाय 'माझी हाफ गर्लफ्रेंड बन', 'भाऊ शाळेत जा, अभ्यास कर, इतक्या लहान वयात तू सेलिब्रिटींना प्रभावित करतोयस', अशा भन्नाट कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :श्रद्धा कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीविमानतळ