Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला झाले दोनच महिने अन् दुसऱ्या अभिनेत्रीसोबत होता अभिनेता, बायकोनंच पकडलं रंगेहाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 14:21 IST

बॉलिवूडमध्ये नाती बनतात आणि तुटतात हे सामान्य आहे.

बॉलिवूड ही भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये नाती बनतात आणि तुटतात हे सामान्य आहे. प्रेम, लग्न आणि घटस्फोट पाहायला मिळतात. नुकतंच एका सेलिब्रिटी वेडिंग फिल्ममेकरने बॉलिवूडमधली एका जोडीबद्दल मोठा खुलासा केला.  लग्नाच्या दोन महिन्यांनंतर एका अभिनेत्यानं पत्नीची फसवणूक केली होती.  पत्नीनेच त्याला व्हॅनिटी व्हॅनमध्ये एक अभिनेत्रीसोबत रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर त्यांचं लग्न मोडलं आणि दोघांचा घटस्फोटही झाल्याचं सेलिब्रिटी वेडिंग फिल्ममेकरने सांगितलं. 

सेलिब्रिटी वेडिंग फिल्ममेकर विशाल पंजाबीने डीजे सिम्झच्या पॉडकास्टमध्ये बॉलिवूडची अनेक रहस्य उघड केली. विशाल पंजाबी हा सर्वात प्रसिद्ध वेडिंग व्हिडीओग्राफरपैकी एक आहे. विशालने अनेक सेलिब्रिटींचं वेडिंश शूट केलं आहे. विशालने दीपिका पदुकोण-रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा-विराट कोहली यांच्यासह अनेक स्टार्सच्या लग्नाचं शूटिंग केलं आहे.

विशाल पंजाबी पॉडकास्टमध्ये म्हणाला, 'एका बॉलिवूड अभिनेत्याने लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच पत्नीला फसवण्यास सुरुवात केली. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका अभिनेत्रीसोबत त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपड्यांशिवाय पत्नीने त्याला रंगेहाथ पकडलं होतं'. पुढे तो म्हणाला, 'हे सर्व इतक्या लवकर घडलं की माझे पैसे बुडाले. लग्नाच्या व्हिडीओसाठी अभिनेत्याला फोन केला असता त्याने फोन उचलला नाही. मी त्याच्या पत्नीला फोन केला असता तिने फोन करू नकोस आणि मला लग्नाचा व्हिडिओ नको आहे, असं सांगितलं. त्यानंतर मी अभिनेत्याच्या मॅनेजरला फोन केला आणि त्यानेही सांगितले की आम्हाला लग्नाचा व्हिडिओ नको आहे. मग मी ते Netflix ला विकण्याचाही विचार केला'. 

विशाल पुढे म्हणाला, 'या घटनेनंतर मी माझ्या कामाचे नियम बदलले. याआधी मी लग्नाच्या व्हिडिओग्राफीसाठी 50 टक्के ॲडव्हान्स घेत असे आणि उर्वरित 50 टक्के लग्नाचे व्हिडीओ त्यांना देताना पैसे घेत होतो. आता मी आधीच पुर्ण फीस घेऊन टाकतो. पण, विशालने तो अभिनेता नेमका कोण होता, याचा खुलासा केला नाही. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीलग्नघटस्फोट