Join us

अशी मावळत्या उन्हांत..! सूर्यास्ताच्या वेळी गिरिजाचं सुरेख व्हिडीओशूट, नेटकऱ्यांच्या खिळल्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 14:12 IST

Girija Oak Godbole: गिरिजाने संध्याकाळच्या वेळी केलेलं व्हिडीओ शूट चर्चेत आलं आहे. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.

मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गिरिजा ओक-गोडबोले (Girija Oak Godbole). उत्तम अभिनयासह सौंदर्य यांच्या जोरावर गिरिजाने आज लाखो जणांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा होत असते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

गिरिजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.  गिरिजाने इन्स्टाग्रामवर तिचा एक मनमोहक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ संध्याकाळच्या वेळी शूट करण्यात आला असून त्यात ती कमालीची सुरेख दिसत आहे.

गिरिजाने या व्हि़डीओशूटसाठी कॉटनची छान साडी नेसली असून त्यावर अगदी मोडके दागिने घातले आहेत. विशेष म्हणजे या साध्याशा लूकमध्येही ती कमालीची सुंदर दिसत आहे. त्यामुळेच सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्या  व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

गिरिजा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने हिंदी, मराठी मालिकांसह सिनेमा, वेबसीरिजमध्येही काम केलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे.

टॅग्स :गिरिजा ओकसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड