Join us
Daily Top 2Weekly Top 5

या 9 पाकिस्तानी सेलिब्रिटींचे या बॉलिवूड स्टार्ससोबत होते अफेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 12:35 IST

प्रेमाला देशांच्या सीमाही रोखू शकत नाही. असंच काहीसं पाकिस्तानातील काही सेलिब्रिटींसोबत झालं आणि त्यांना भारतातील लोकांची प्रेम झालं.

प्रेम कधीही, कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी होऊ शकतं. प्रेमात कधीही त्या व्यक्तीचा रंग, जात, धर्म पाहिला जात नाही. प्रेमाला देशांच्या सीमाही रोखू शकत नाही. असंच काहीसं पाकिस्तानातील काही सेलिब्रिटींसोबत झालं आणि त्यांना भारतातील लोकांसी प्रेम झालं. अशाच काही पाकिस्तानी सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊया जे भारतातील सेलिब्रिटींच्या प्रेमात पडले. 

इम्रान खाम आणि झिनत अमान

बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणारी अभिनेत्री झीनत अमान आणि इम्रान खानची भेट 1980 मधील पाकिस्तानच्या भारत दौऱ्या दरम्यान झाली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनतर काही वर्ष त्यांचं नातं होत. पण पुढे ते वेगळे झाले. 

शोएब अख्तर आणि सोनाली बेंद्रे

शोएब अख्तर आणि सोनाली बेंद्रे यांच्यात अफेअर असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये अनेकदा झाली. पण दोघांनी कधीही जाहीरपणे आपलं नातं स्विकारलं नाही. मात्र, त्यावेळ शोएबने अभिनेत्री म्हणून सोनालीबद्दलचं प्रेम अनेकदा बोलून दाखवलं होतं. 

फरहान सईद आणि अम्रिता राव

(Image Credit: www.brandsynario.com)

बॉलिवूडच्या काही सिनेमांमधून झळकलेली अभिनेत्री अम्रिता राव आणि फरहान सईद यांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र बघण्यात आलं. त्यावरुन ते दोघे अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते असे बोलले जात होते. 

इम्तियाझ अली आणि इमान अली

(Image Credit: FilmiBeat)

पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल इमान अली ही भारतात बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी आली होती. दरम्यान तिची भेट दिग्दर्शक इम्तियाझ अलीसोबत झाली. दोघे काही वर्ष सोबत होते. पण नंतर दोघांमध्ये वाद झाले आणि इमान पाकिस्तानला परत गेली. 

वीना मलिक आणि अश्मित पटेल

बिग बॉस शोदरम्यान वीना मलिक आणि अभिनेता अश्मित पटेल यांच्यात अफेअर होतं. शोनंतरही काही महिने दोघे एकत्र होते. पण नंतर दोघे वेगळे झाले. 

वसीम अक्रम आणि सुश्मिता सेन

पहिल्या पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर वसीम अक्रम हा सुश्मिता सेनकडे आकर्षित झाला होता. त्यानंतर दोघे अनेक वर्ष प्रेमात होते. पण नंतर वसीम दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला. 

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिका हा भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झाच्या प्रेमात पडला. त्यानंतर दोघांनी 2010 मध्ये लग्न केलं. 

सौम्या अली आणि सलमान खान

बॉलिवूडच्या काही सिनेमांमध्ये झळकलेली पाकिस्तानी अभिनेत्री आणि अभिनेता सलमान खान यांच्यातील प्रेम सर्वांनाच माहीत आहे. दोघेही तब्बल 8 वर्ष एकमेकांच्या प्रेमात होते. 

मोहसीन खान आणि रिना रॉय

काही वर्षांतच्या अफेअरनंतर बॉलिवूड अभिनेत्री रिना रॉय हिने पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानसोबत 1983 मध्ये लग्न केले होते. पण त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही. नंतर दोघांनी घटस्फोट घेतला.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी