Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या या 7 अभिनेत्री आहेत राजघराण्यातील सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 12:44 IST

तुम्हाला वाचून आश्चर्य होईल की, या अभिनेत्री खऱ्या आयुष्यातही राजघराण्यातील आहेत. चला जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री..... 

बॉलिवूडच्या या अभिनेत्रींनी आपल्या अदाकारीने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. यातील काहींनी तर रुपेरी पडद्यावर राणींच्याही भूमिका साकारल्या आहेत. पण तुम्हाला वाचून आश्चर्य होईल की, या अभिनेत्री खऱ्या आयुष्यातही राजघराण्यातील आहेत. चला जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री..... 

अदिती राव हैदरी

अदितीच्या सौंदर्याचे लाखो चाहते असतील पण अनेकांना हे माहीत नाहीये की, ती एका राजघराण्यातील सदस्य आहे. अदिती ही राजा अकबर हैदरी यांची पणती आहे आणि मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची भाची आहे. ते आसामचे माजी राज्यपालही होते. 

किरण राव

किरण राव ही अभिनेत्री नसली तरी एक यशस्वी निर्माती, दिग्दर्शिका आहे. त्यासोबतच अभिनेता आमीर खानची पत्नी किरण राव ही आपल्या शांत स्वभावासाठीही ओळखली जाते. किरण राव हिचाही जन्म एका राजघराण्यातील आहे. किरणचे आजोबा जे रामेश्वर हे वानापार्थीचे राजा होते. किरणचा जन्म तेलंगणामध्ये झाला आणि  तिचं बालपण कोलकात्यात गेलं. त्यानंतर तिचा परिवार मुंबईत शिफ्ट झाला. तसेच किरण ही अदिती राव हैदरीची चुलत बहीण आहे. 

सोहा अली खान

सोहा ही नवाबांच्या परीवारातील आहे. ती पटोदी परिवारातील सदस्य आहे. सोहाचे आजोबा इफ्तिखार अली खान हे आठवे पटोदी नवाब होते. त्यानंतर तिचे वडील मन्सूर अली खान पटोदी यांच्यावर ती जबाबदारी आली. 

रिया आणि रायमा सेन

(Image Credit: www.youngisthan.in)

बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या रिया आणि रायमा सेन हा बहिणीही शाही परिवारातील आहेत. रियाचे वडील त्रिपुराती राजघराण्य़ातील सदस्य आहेत. तिची आजी इला देवी या कूच बेहारच्या राजकुमारी होत्या. त्यांचीच लहान बहीण जयपूरची राजकुमारी होती. 

सोनल चौहान

काही मोजक्याच बॉलिवूड सिनेमात दिसलेली अभिनेत्री सोनल चौहान ही उत्तर प्रदेशातील राजघराण्यातील सदस्य आहे.  

भाग्यश्री

भाग्यश्री ही सांगलीतील पटवर्धन या राजघराण्यातील सदस्य आहे. भाग्यश्री पूर्ण नाव श्रीमंत राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन असं आहे. सांगलीचे राजा श्रीमंत विजयसिंह राव माधवराव पटवर्धन हे तिचे वडील आहेत. 

सागरिका घाटगे

चक दे इंडिया या सिनेमाच्या माध्यमातून चर्चेत आलेली अभिनेत्री सागरिका घाटगे ही सुध्दा राजघराण्यातील सदस्य आहे. सागरिकाचे वडील विजयेंद्र सिंहराव घाटगे हे इंदौरच्या शाही घराण्याचे वंशज आहेत. इंदौरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या सीताराजे घाटगे यांचे विजयेंद्र हे पुत्र. सीताराजे यांचे पती कर्नल एफडी घाटगे कोल्हापूरच्या कसबा कागलमधील शाही कुटुंबाचे सदस्य आहेत.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी