Join us
Daily Top 2Weekly Top 5

पार्टनरकडून अत्याचाराचा करावा लागला या अभिनेत्रींना सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 16:39 IST

बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनाही करावा लागला आहे. बॉलिवूडच्या खालील काही अभिनेत्रींना आपल्या पार्टनरकडून हिंसेचा सामना करावा लागला होता. 

कौटुंबिक हिंसा आणि पतींकडून किंवा बॉयफ्रेन्डकडून मारहाण अशा घटनांचा सामना केवळ सर्वसामान्यच नाहीतर बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनाही करावा लागला आहे. बॉलिवूडच्या खालील काही अभिनेत्रींना आपल्या पार्टनरकडून हिंसेचा सामना करावा लागला होता. 

1) बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा ही 2005 मध्ये नेस वाडिया याला डेट करत होती. नेस वाडिया हा आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा सहमालक होता. दरम्यान एका पार्टीमध्ये नेस वाडियाने प्रीति झिंटाला मारहाण केली होती. त्यानंतर दोघे वेगळे झाले होते. इतकेच नाहीतर प्रीतिने वाडिया विरोधात पोलीसात तक्रारही दिली होती. 

2) 2003 साली अभिनेत्री करिश्मा कपूरने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले होते. पण 2012 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. त्यावेळी करिश्माने संजय कपूरवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला होता. 

3) बॉलिवूड क्वीन कंगना राणावत आणि अभिनेता आदित्य पांचोली यांच्याबाबत खूपकाही बोललं गेलंय. कंगनानेही आदित्यने मारहाण केल्याचा आरोप लावला होता. दोघे एकत्र असताना फिजिकलही झाले होते. पण हा वाद इतका पेटला होता की, कंगनाने आदित्य विरोधात तक्रार दाखल केली होती. 

4) बॉलिवूडचं सर्वात चर्चीत कपल ऐश्वर्या राय आणि सलमान खान हे होतं. दोघांमधील वाद सर्वांनाच माहीत आहे. सलमानच्या वाईट वागणुकीमुळेच ऐश्वर्याने त्याला सोडले होते. त्यानंतर ऐश्वर्याने सलमान खान विरोधात एफआयआर नोंदवला होता. 

5) एक काळ गाजवणारी अभिनेत्री झिनत अमानला सुद्धा कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. संजय खान हा तिचा पहिला पती होता. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर झिनतचा दुसरा पती मजहर खानने तिचं जगणं मुश्किल केलं होतं. 

6) टीव्हीवरील क्वीन म्हटली जाणारी अभिनेत्री श्वेता तिवारीवर तिच्या पतीने अत्याचार केले होते. राजा चौधरी या तिच्या पतीने नशेत तिला मारहाण केली होती. त्यानंतर तिने घटस्फोट घेतला होता. 

7) माजी मॉडल आणि 1999 मध्ये मिस वर्ल्ड ठरलेली अभिनेत्री युक्ता मुखीने बिझनेसमन प्रिन्स तुलीसोबत लग्न केले होते. तर 2013 साली तिने प्रिन्स तुली विरोधात हुंड्यासाठी अत्याचार केल्याबाबत तक्रार दाखल केली होती. 2014 मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी