Join us
Daily Top 2Weekly Top 5

'६६ सदाशिव' पोस्टर OUT, 'या' कलाकारांच्या असणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 10:32 IST

योगेश देशपांडेने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने योगेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

’६६ सदाशिव’ हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. योगेश देशपांडेने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने योगेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. मुळात चित्रकार असलेल्या योगेश यांनी रेडीओ, टीव्हीसाठी जाहिरात लेखन-दिग्दर्शन केले आहे. याशिवाय पु.लं, गदिमा यांच्यावरील कार्यक्रमासह विविध सांगीतिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे संहिता लेखन आणि सादरीकरण करत असताना त्यांनी अभिनयाची रुचीही जपली. ‘अवंतिका’, पिंपळपान’, ‘रेशीमगाठी’ आणि ग्रहण या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. गेल्या ब-याच दिवसांपासून '66 सदाशिव' सिनेमाची सा-यांनाच उत्सुकता लागली आहे. 

अखेर त्याचे पहिले पोस्टर समोर आले आहे. सिनेमात कोणते कलाकार झळकणार याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या कलाकाराचे नाव उलगडले आहे. मोहन जोशी सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून इतर कलाकारांचीही नावे लवकरच समोर येतील. चित्रपटाची निर्मिती ‘पुणे टॉकीज प्रा. लि.’ यांची असून हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर निर्माते आहेत. तर नरेंद्र भिडे यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. जानेवारी महिन्यातच सिनेमाचे शूटिंग संपले असून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आणखीन थोडा वेळ हा सिनेमा पाहण्यासाठी रसिकांनी वाट पहावी लागणार हे मात्र नक्की.   

टॅग्स :मोहन जोशी