Join us
Daily Top 2Weekly Top 5

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेची टीम "चेतना"च्या विद्यार्थ्यांसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 18:03 IST

Television kolhpaur- शंभर भाग पूर्ण केल्याबद्दल दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या टीमने शेंडा पार्क येथील चेतना अपंगमती विकास संस्थेतील विकलांग मुलांसोबत अनोख्या पध्दतीने खास दिवस साजरा केला.

ठळक मुद्देदख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेचे शंभर भाग पूर्ण टीमने साजरा केला "चेतना"च्या मुलांसोबत खास दिवस

कोल्हापूर : शंभर भाग पूर्ण केल्याबद्दल दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या टीमने शेंडा पार्क येथील चेतना अपंगमती विकास संस्थेतील विकलांग मुलांसोबत अनोख्या पध्दतीने खास दिवस साजरा केला.चेतना अपंगमती विकास संस्था गेली अनेक वर्ष बौद्धिकदृष्ट्या अक्षम मुलांचं संगोपन करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहाण्याचे धडे देत आहे.या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याच्या हेतूने दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या टीमने या मुलांसोबत सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं. या प्रसंगी चेतना शाळेतील विद्यार्थ्यांसोबत, जोतिबाची भूमिका साकारणारे अभिनेते विशाल निकम, प्राचार्य पवन खेबुडकर, निर्माते महेश कोठारे, माधुरी पाटकर आणि मालिकेतील प्रमुख कलाकार उपस्थित होते.मालिकेत दिसणाऱ्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ज्योतिबा आणि मालिकेतील सर्व कलाकारांची भेट घेत त्यांनी मालिकेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. २२ फेब्रुवारीपासून ही मालिका आता नव्या वेळेत म्हणजे सायंकाळी ६ वाजता प्रसारित होणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनजोतिबाकोल्हापूरमहेश कोठारे