नागरिकांना योजनांचा लाभ घेता यावा म्हणून ‘आवाज दो’ यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 06:00 AM2019-10-12T06:00:00+5:302019-10-12T06:00:38+5:30

अजयपूर व बोर्डा या गावांमध्ये सुध्दा सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर सभांना संबोधित केले. चिचपल्ली, जांभर्ला, नंदगूर, हळदी या गावांना भेटी देत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी नागरिकांना दिली. प्रत्येक गावात नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

The 'Voice Do' mechanism so that citizens can avail of the schemes | नागरिकांना योजनांचा लाभ घेता यावा म्हणून ‘आवाज दो’ यंत्रणा

नागरिकांना योजनांचा लाभ घेता यावा म्हणून ‘आवाज दो’ यंत्रणा

googlenewsNext
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : नागाळा येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येत्या काळात बांबुपासून रोजगार निर्मितीच्या दृष्टीने बांबु क्लस्टरची निर्मिती आपण करणार आहोत. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सहज घेता यावा यादृष्टीने ‘आवाज दो’ही यंत्रणा आपण येत्या काळात राबविणार आहोत, अशी माहिती बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
भाजपचे उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर तालुक्यातील नागाळा येथे आयोजित जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपा नेते रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, रोशनी खान, आदिवासी आघाडीचे नेते अशोक अलाम, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत धोडरे, वासुदेव गावंडे, दीपक खनके, अरूण गेडाम, इम्रान पठाण आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षात विकासाचा झंझावात आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण केला आहे. चिचपल्ली येथे बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे काम प्रगतिपथावर आहे. बांबुपासून तयार होणाऱ्या या इमारतीची दखल सिंगापूरच्या प्रसिध्दी माध्यमांनी घेतली आहे. वाघाच्या हल्ल्यात म़ृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मिळणाऱ्या अर्थसहाय्याच्या रकमेत वाढ करून ती मदत १५ लाख रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला आहे.
वनालगतच्या गावांमध्ये मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवनविकास योजनेच्या माध्यमातून एलपीजी गॅस वाटप व इतर अनेक सुविधा आम्ही उपलब्ध केल्या आहेत. पिंपळझोरा येथील झोपला मारोती परिसराचे सौंदर्यीकरणाचे काम आम्ही पूर्ण केले आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून मान्यता देण्याच्या दृष्टीने आम्ही विविध उपक्रम राबवित आहोत. आजवर कधी नव्हे इतका निधी गेल्या पाच वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या सहाय्याने शेतकरी प्रशिक्षण केंद्र हा उपक्रम आपण राबवित आहोत. मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. जे.के. ट्रस्टच्या मदतीने भाकड जनावरांचे दुभत्या जनावरात रूपांतरण करण्यासाठीचे केंद्र मारोडा येथे कार्यान्वित आहे, याकडेही मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.

अजयपूर, बोर्डा येथेही सभा
अजयपूर व बोर्डा या गावांमध्ये सुध्दा सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर सभांना संबोधित केले. चिचपल्ली, जांभर्ला, नंदगूर, हळदी या गावांना भेटी देत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी नागरिकांना दिली. प्रत्येक गावात नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या पदयात्रा व भेटींना तसेच जाहीर सभांना लाभणारा जनतेचा उदंड प्रतिसाद त्यांच्या विजयाची ग्वाही देणारा ठरला.

Web Title: The 'Voice Do' mechanism so that citizens can avail of the schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.