ताडोबात २ वाघांची कडवी झुंज; छोटा मटकाच्या हल्ल्यात दुसऱ्याचा मृत्यू

By राजेश भोजेकर | Updated: May 13, 2025 11:40 IST2025-05-13T10:59:43+5:302025-05-13T11:40:24+5:30

Chandrapur : छोटा मटकाने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी दुसऱ्या वाघाला केले ठार

Two tigers fight in Tadoba; Chhota Matka kills the other | ताडोबात २ वाघांची कडवी झुंज; छोटा मटकाच्या हल्ल्यात दुसऱ्याचा मृत्यू

Two tigers fight in Tadoba; Chhota Matka kills the other

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरमधील खडसंगी वनपरिक्षेत्रातील रामदेगी परिसरात मंगळवारी सकाळी छोटा मटका नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघाची एका नवीन वाघाची झुंज झाली. यामध्ये छोटा मटकाने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी दुसऱ्या वाघाला ठार केले आहे. सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास ही झुंज झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

रामदेगी हा परिसर छोटा मटका या वाघाचा 'इलाखा' म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रात नवीन वाघ आला होता. छोटा मटकाने त्याला ठार करून या इलाख्यात कोणीच येऊ शकत नसल्याचे सिद्ध केले आहे. या घटनेची माहिती होताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करीत आहे.

Web Title: Two tigers fight in Tadoba; Chhota Matka kills the other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.