Maharashtra Election 2019 ; निवडणूक काळात अधिकाऱ्यांनी कार्यक्षम राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST2019-10-11T06:00:00+5:302019-10-11T06:00:34+5:30
जिल्हाधिकारी डॉ. खेमनार म्हणाले, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निवडणुकीशी संबंधित सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करून समन्वयाने काम करावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांना भेटी देत केंद्र संबंधातील व परिसरातील कुठल्याही अडचणींबाबत त्वरित अहवाल सादर करावा. प्रभावीपणे कार्य कराल तर कुठेही निवडणूक नियमांचे उल्लंघन होणार नाही.

Maharashtra Election 2019 ; निवडणूक काळात अधिकाऱ्यांनी कार्यक्षम राहावे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी अधिक दक्षता व कार्यक्षमतेने पार पाडावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन सभागृहात गुरूवारी सकाळी ११ वाजता क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. खेमनार म्हणाले, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निवडणुकीशी संबंधित सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करून समन्वयाने काम करावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांना भेटी देत केंद्र संबंधातील व परिसरातील कुठल्याही अडचणींबाबत त्वरित अहवाल सादर करावा. प्रभावीपणे कार्य कराल तर कुठेही निवडणूक नियमांचे उल्लंघन होणार नाही. निवडणूक विभागातर्फे अधिकार देण्यात आले आहेत. यांचा वापर निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी करा. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचा सखोल आणि काळजीपूर्वक अभ्यास करावा, असेही जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी खलाटे म्हणाले, विधानसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने दक्ष राहिले पाहिजे. क्षेत्रातील गावे, मतदान केंद्र ईव्हीएम मशिनविषयी सखोल माहिती ठेवावी. अधिकाऱ्यांना निवडणुकीशी संबंधीत कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता मतदान निर्भय वातावरणात होण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. निवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बुथ मॅनेजमेंट प्लान तयार करावा
मतदान दिवसाकरिता बूथ मॅनेजमेंट प्लान तयार करावा. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांवर मूलभूत सोयीसुविधांच्या उपलब्धतेसाठी उपाययोजना कराव्यात. मतदान प्रक्रिया निर्भय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदारांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करावे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवकांच्या संपर्कात राहून गावनिहाय मतदान केंद्रांचा अभ्यास करण्याचे सूचविण्यात आले.