Maharashtra election 2019 ; काँग्रेस-सेनेच्या लढतीत आप व वंचितमुळे रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:00 AM2019-10-14T06:00:00+5:302019-10-14T06:00:38+5:30

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या गणिताबरोबरच अन्य जातीय समीकरणही जुळविले जात आहे. तर आजवर झालेल्या निवडणुकांवर दृष्टीक्षेप टाकल्यास अपवाद वगळता भाजपने शिवसेनेच्या व शिवसनेने भाजपच्या उमेदवाराला किती साथ दिली याबाबत या पक्षात कधीही एकमत जाणवले नाही. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी या आपचा झाडू हातात घेऊन मैदानात आहेत.

Maharashtra election 2019 ; In the Congress-Sena fight, you are colored by the deprivation and deprivation | Maharashtra election 2019 ; काँग्रेस-सेनेच्या लढतीत आप व वंचितमुळे रंगत

Maharashtra election 2019 ; काँग्रेस-सेनेच्या लढतीत आप व वंचितमुळे रंगत

Next
ठळक मुद्देब्रह्मपुरी विधानसभा : जुळवले जाताहेत जातीय समीकरणाचेही गणित

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात काँग्रेस व शिवसेना यांच्यातील लढतीत वंचित बहुजन आघाडीमुळे चुरस तर आपमुळे या निवडणुकीला नवा रंग चढला आहे. उमेदवारांकडून जातीय समीकरणेही मांडले जात आहे. एकूणच घडामोडी बघता या मतदार संघाची निवडणूक रंजक बनत चालली आहे.
ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात ११ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. यामध्ये काँग्रेसचे हेवीवेट नेते विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे संदीप गड्डमवार, आम आदमी पार्टीच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी व अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेत रंगणाऱ्या सामन्यात आप आणि वंचित बहुजन आघाडीने प्रचारात गती वाढविल्याने निवडणुकीची चुरसही वाढताना दिसत आहे. काँग्रेसने वडेट्टीवार यांना रिंगणात उतरविल्यामुळे त्यांच्या विरोधात कोण राहील, याकडे जनतेचे लक्ष लागले होते. ऐनवेळी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवार आयात करून बाजी लावली. गड्डमवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. परंतु मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहून इमाने-इतबारे काम करणाºया कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली आहे. नेत्याने पक्षांतर केल्याने कोणता झेंडा हाती घ्यावा, अशी द्विधामनस्थिती अपवाद वगळता काही कार्यकर्त्यांची झाली आहे. काहींना नाईलाजास्तव शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घ्यावा लागला असल्याचे समजते. ही बाब हेरून वंचित बहुजन आघाडीनेही नवे डावपेच आखणे सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या गणिताबरोबरच अन्य जातीय समीकरणही जुळविले जात आहे. तर आजवर झालेल्या निवडणुकांवर दृष्टीक्षेप टाकल्यास अपवाद वगळता भाजपने शिवसेनेच्या व शिवसनेने भाजपच्या उमेदवाराला किती साथ दिली याबाबत या पक्षात कधीही एकमत जाणवले नाही. श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी या आपचा झाडू हातात घेऊन मैदानात आहेत. त्यांचा प्रचार वेगळा वाटत असला तरी त्या राजकीय क्षेत्रात किती प्रभाव पाडतात, हे बघण्यासारखे आहे. काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच गती घेतली असून वंचित आणि आपने लढतीत नवा रंग भरल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होईल, असे चित्र आहे.
 

Web Title: Maharashtra election 2019 ; In the Congress-Sena fight, you are colored by the deprivation and deprivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.