Maharashtra Election 2019 : ‘ईव्हीएम’ सज्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:00:59+5:30
२१ ऑक्टोबर २०१९ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा, राजुरा विधानसभा मतदार संघातील निवडणूक कार्यालयात स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात आल्या. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट आदी सामग्रीची मतदारसंघनिहाय निवडणूक कार्यालय परिसरात तपासणी केली जात आहे.

Maharashtra Election 2019 : ‘ईव्हीएम’ सज्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाने निश्चित केलेल्या स्ट्राँगरूमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व अन्य सामग्री ठेवण्यात आली. या ठिकाणी सशस्त्र पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. रविवारी विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक साहित्य वाटप करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम मशीन ओके करण्याची प्रक्रियाही सुरू झाली. याचाच भाग म्हणून सोमवारपासून झोनल अधिकाऱ्यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण दिल्या जात आहे.
२१ ऑक्टोबर २०१९ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा, राजुरा विधानसभा मतदार संघातील निवडणूक कार्यालयात स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात आल्या. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट आदी सामग्रीची मतदारसंघनिहाय निवडणूक कार्यालय परिसरात तपासणी केली जात आहे. स्ट्राँगरूमध्ये मतदान केंद्रनिहाय प्रत्येक मशिन व इतर साहित्य ठेवण्यात आले. मतदानासाठी सोमवारपासून मशिन तयार करणे सुरू झाले असून मंगळवारपर्यंत पूर्ण होणार आहे. जिल्ह्यात २१ सप्टेंबर २०१९ पासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर जाहिरात करण्यापूर्वी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती तथा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. काही उमेदवारांनी स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटची माहिती एमसीएमसी कमिटीला सादर केली नाही. त्यामुळे पूर्वपरवानगी घेण्याकरिता उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाºयाकडे अर्ज दाखल करावा, अशी सूचना प्रशासनाने दिल्या.
असे होते कंट्रोल युनिट ‘सील’
मशिन तयार करण्यासाठी प्रत्येक बॅलेट युनिटवर उमेदवाराचे नाव व चिन्ह असणारे बॅलेट पेपर चिपकविण्यात येणार आहे. उमेदवारांच्या नावासमोरील चिन्हांचे विन्डो खुल्या करून मशिन सिलींग करण्यात येते. त्यानंतर कंट्रोल युनिट जोडून त्या- त्या क्रमांकवर उमेदवार अंतिम करण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर उमेदवाराच्या समोरील बटन दाबल्यानंतर ते बटन दाबलेल्या चिन्हासमोर जाते की नाही, याची ट्रायल घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच सर्व मशिन निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिपत्त्याखाली कंट्रोल युनिट सिल करून ते मशिन मतदानासाठी तयार करण्यात येणार आहे.
सहा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या (एमसीएमसी) सहकार्यासाठी सहा विधानसभा मतदारसंघात नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली. राजुरा विधानसभाकरिता मुख्याधिकारी अर्शिया जुही व उपविभागीय वनाधिकारी अमोल गरकल, चंद्र्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी मनपाचे जनसंपर्क अधिकारी युधिष्ठीर रैच, बल्लारपूरकरिता कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी किरण वाढई व सहाय्यक प्रशासकीय अधिकारी नितीन फुलझेले, ब्रह्मपुरीकरिता बालविकास प्रकल्प अधिकारी कुणाल धुमाळ, चिमूर विधानसभाकरिता नायब तहसीलदार संदीप बांगडे, वरोराकरिता तहसीलदार महेश शितोडे हे नोडल ऑफिसर म्हणून कर्तव्य बजावणार आहेत.