विसर्जनासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:39 AM2019-09-11T00:39:58+5:302019-09-11T00:40:23+5:30

शहराच्या मुख्य मार्गाने विसर्जन मिरवणूक निघणार आहे. कस्तुरबामार्गे महात्मा गांधी मार्ग व शहरातील प्रमुख मार्गावरून देखाव्यांसह मिरवणूक काढण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये व कायद्या सुव्यवस्था अबाधित राहावी, यादृष्टीने पोलीस वाहतूक शाखेने मार्ग आखून दिले आहेत.

Changes in transport system for immersion | विसर्जनासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

विसर्जनासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

Next
ठळक मुद्देचंद्रपुरात गुरूवारी बाप्पाचे विसर्जन : पोलीस प्रशासन सज्ज, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दहा दिवस पूजा-आराधना, धार्मिक व प्रबोधनपर देखावे आदी कार्यक्रमांनी गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर गुरूवारी चंद्रपुरातील सार्वजनिक बाप्पाचे ढोल ताश्यांच्या गजरात विसर्जन केल्या जाणार आहे. याकरिता पोलीस प्रशासनाने शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे.
शहराच्या मुख्य मार्गाने विसर्जन मिरवणूक निघणार आहे. कस्तुरबामार्गे महात्मा गांधी मार्ग व शहरातील प्रमुख मार्गावरून देखाव्यांसह मिरवणूक काढण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होऊ नये व कायद्या सुव्यवस्था अबाधित राहावी, यादृष्टीने पोलीस वाहतूक शाखेने मार्ग आखून दिले आहेत. शहरातील मुख्य मार्ग नियमित वर्दळीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरून दररोज होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत सावरकर चौक, बसस्थानक चौक, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक ते कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक, पठाणपुरा गेट ते जटपुरा गेट मार्ग, प्रियदर्शिनी चौक ते जुना वरोरा नाका हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे.
नागपूरकडून येणारी आणि बल्लारपूर, मूलकडे जाणारी सर्व वाहने वरोरा नाका उड्डाण पुलावरून सावरकर चौक ते बंगाली कॅम्पमार्गे मूल आणि बल्लारपूरकडे रवाना होतील. मूल व बल्लारपूरकडून येणारी तसेच नागपूरकडे जाणारी वाहने बंगाली कॅम्प, सावरकर चौकातून उड्डाणपूलावरून नागपूर मार्गाने पुढे जातील. शहरात जाणारी वाहने रामनगर संत केवलराम चौक, सेंट मायकल स्कूल, नगिनाबाग, सवारी

बंगला चौकामार्गे चोर खिडकीतून
शहरात प्रवेश करतील. शहरातून बाहेर निघणाऱ्या वाहनधारकांनी बिनबा गेट, रहमतनगर या मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना पोलीस विभागाने दिल्या. विसर्जनासाठी शहरात १३ ठिकाणी नो हॉकर्स झोन आणि नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहे गणेश विसर्जन बघण्यासाठी येणाºया नागरिकांना वाहने ठेवण्यास अडचणी येऊ नये, याकरिता सात ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरातील नो पार्किंग, नो हॉकर्स झोन
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील नो पार्किंग, नो हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले. जटपुरा गेट ते कस्तुरबा चौकापर्यंतचा मार्ग, जटपुरा गेट ते रामाळा तलाव रोड, जटपुरा गेट ते प्रियदर्शिनी चौक, जटपुरागेट ते दवा बाजार चौक, कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेट, कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेट, गांधी चौक ते मिलन चौक, कस्तुरबा चौक ते कारागृह रोड चौक, मिलन चौक ते बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, दस्तगीर चौक ते मिलन चौक, हिंदी सिटी हायस्कूल ते रघुवंशी कॉम्प्लेक्सपर्यंत, मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीजपर्यंत आदी मार्गांवर गुरूवारी सकाळी सहा वाजतापासून शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत दुकाने लावता येणार नाही. शिवाय, वाहने उभी ठेवण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

असे आहेत पार्किंग झोन
शहरातील नागरिकांना वाहने पार्किंग करताना त्रास होऊ नये, यासाठी पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. चांदा क्लब मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वरोरा नाका, सेंट मायकल हायस्कूल, नगिनाबाग, सिंधी पंचायत भवन, व्यायामशाळा ग्राऊंड पठाणपुरा चौक, डीएड् कॉलेज बाबूपेठ व महाकाली मंदिराच्या मैदानावर वाहन पार्किंग झोन तयार झाला आहे. या मार्गावर असणारे व्यावसायिक व रहिवाशांनी स्वत:ची वाहने ज्युबिली हायस्कूल पटांगण, महानगर पालिका पटांगण येथे पार्क करावे, असे पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गणेशोत्सवादरम्यान पर्यावरण प्रदूषित होऊ नये, याकरिता महानगर पालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख चौकांमध्ये पर्यावरणपूरक कुंड तयार केले आहे. शहरातील काही सामाजिक संस्थांनीही विविध ठिकाणी कुंड तयार करून नागरिकांना पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.

सार्वजनिक गणेश मंडळांना मूर्ती विसर्जनादरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत. भाविकांना मिरवणुका बघता यावे, याचा विचार करून चंद्रपुरातील वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला. नागरिकांनी सहकार्य करून कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे.
- डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

Web Title: Changes in transport system for immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.