Chandrapur Election Results; Sudhir Mungantiwar's double hat trick | चंद्रपूर निवडणूक निकाल; सुधीर मुनगंटीवार यांची डबल हॅटट्रिककडे वाटचाल

चंद्रपूर निवडणूक निकाल; सुधीर मुनगंटीवार यांची डबल हॅटट्रिककडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या १३ व्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांनी सातव्या फेरीत सात हजारांची आघाडी घेतली आहे. मतमोजणीस प्रारंभ झाल्यापासूनच त्यांची ही आगेकूच सुरू आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे डॉ. विश्वास झाडे यांना दुसऱ्या फेरीअखेर २६६४ मते मिळाली होती तर मुनगंटीवार यांना ३७८० एवढी मते होती.
राज्याचे अर्थ, वन आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राला चांगले महत्व आले आहे. यावेळच्या निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार (भाजपा), राजू झोडे (वंचित बहुजन आघाडी) आणि डॉ. विश्वास झाडे (कॉंग्रेस) या तिघांमध्ये लढत बघायला मिळाली.
मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केलेल्या दारूबंदीमुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर होता. या सोबतच त्यांनी या भागाचा केलेला विकास ही त्यांचेसाठी जमेची बाजू ठरली आहे. अर्थ, वन अशी महत्त्वाची खाती असलेल्या मंत्री पदामुळे जिल्ह्याला बहुमान मिळाला आहे. त्यांनी सुरू केलेली बरीचशी विकास कामे सुरू आहेत. त्यात खंडू पडू नये. त्यामुळे नाराजी बाजूला सारून मतदारांनी त्यांना कौल दिल्याचे चर्चेतून दिसून येते.


 

Web Title: Chandrapur Election Results; Sudhir Mungantiwar's double hat trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.