Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?

३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?

Home Loan EMI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) शुक्रवारी सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली. आरबीआयनं रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात केली. तर रेपो दरात गेल्या दोन वेळासह आतापर्यंत १ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:56 IST2025-06-07T14:55:14+5:302025-06-07T14:56:08+5:30

Home Loan EMI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) शुक्रवारी सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली. आरबीआयनं रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात केली. तर रेपो दरात गेल्या दोन वेळासह आतापर्यंत १ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

you will save 4 63 lakhs on a home loan of 30 lakhs enter your loan amount and see how much you will save | ३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?

३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?

Home Loan EMI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) शुक्रवारी सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली. आरबीआयनं रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात केली. तर रेपो दरात गेल्या दोन वेळासह आतापर्यंत १ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. कार लोन, गृहकर्ज घेणाऱ्यांना हा मोठा दिलासा आहे. जर तुम्हीही गृहकर्ज घेतलं असेल तर यामुळे तुमची बरीच बचत होईल. जाणून घेऊया ३० लाख, ५० लाख, ७५ लाख आणि १ कोटी रुपयांच्या कर्जावर तुमची किती बचत होईल? तुम्ही तुमच्या कर्जाच्या रकमेनुसार गणना करू शकता.

व्याजदर ९.५ टक्क्यांवरून ८.५ टक्क्यांवर

समजा तुम्ही ९.५ टक्के व्याजदरानं गृहकर्ज घेतलं होतं. आता रेपो दरात १ टक्क्यांची कपात केल्यानंतर व्याजदर ८.५ टक्क्यांवर आला आहे. अशा परिस्थितीत २० वर्षांच्या कालावधीत ३० लाख रुपयांच्या कर्जावरील तुमचा मासिक ईएमआय १,९२९ रुपयांनी कमी होईल आणि एकूण व्याजामध्ये ४.६३ लाख रुपयांची बचत होईल. ५० लाख रुपयांच्या कर्जावर ईएमआय ३,२१५ रुपयांनी कमी होईल आणि व्याजामध्ये ७.७१ लाख रुपयांची बचत होईल. ७५ लाख रुपयांच्या गृहकर्जावर ईएमआय ४,८२३ रुपयांनी कमी होईल आणि व्याजामध्ये ११.५८ लाख रुपयांची बचत होईल. तर १ कोटी रुपयांच्या कर्जावर ईएमआयमध्ये ६,४३१ रुपये आणि व्याजामध्ये १५.४३ लाख रुपयांची बचत होणार आहे.

बचतीची गणना कशी कराल

वरील गृहकर्जाची रक्कम तुमच्या कर्जाच्या रकमेशी जुळत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. रेपो दरात कपात केल्यानंतर गृहकर्जावरील बचतीचा हिशेब तुम्ही सहज करू शकता. आपल्याला फक्त आपल्या कर्जाची रक्कम, कर्जाचा कालावधी आणि व्याज दर माहीत असणं आवश्यक आहे. दरम्यान, पुढील कॅलक्युलेटरच्या मदतीनं तुम्ही किती बचत होईल याची गणना करू शकता. https://www.lokmat.com/business/emi-calculator/

गृहकर्जाच्या कॅल्क्युलेटरमध्ये जुना व्याजदर, कर्जाची रक्कम आणि मुदत टाकावी लागेल. तुम्हाला तुमचा ईएमआय आणि तुम्हाला भरावी लागणारी एकूण रक्कम कळेल. यानंतर तुम्हाला कर्जाची रक्कम, नवीन व्याजदर आणि मुदत एन्टर करावी लागेल. तुम्हाला नवीन ईएमआय आणि एकूण रकमेची माहिती मिळेल. जुन्या रकमेतून नवीन रक्कम वजा करून बचत काढता येईल. त्याचप्रमाणे तुमचा ईएमआय किती कमी झाला आहे, हेही तुम्हाला कळेल.

Web Title: you will save 4 63 lakhs on a home loan of 30 lakhs enter your loan amount and see how much you will save

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.