Will India agree on the largest trade deal? by narendra modi in bankok | सर्वात मोठ्या व्यापारी करारावर भारत सहमती दर्शविणार?
सर्वात मोठ्या व्यापारी करारावर भारत सहमती दर्शविणार?

बँकॉक : क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारीची (आरसीईपी) दीर्घ काळापासून सुरु असलेली चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, भारताने योग्य प्रस्ताव स्पष्टपणे ठेवले आहेत. मुक्त व्यापारासाठी भारत प्रामाणिकपणे चर्चा करत आहे. दरम्यान, जगातील सर्वात मोठ्या व्यापारी करारावर भारत सहमती दर्शविणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारत वगळता सर्व १५ आरसीईपी सदस्य देश या कराराला अंतिम स्वरुप देण्यासाठी सहमत आहेत. प्रस्तावित करारावरील बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की, अपेक्षेपेक्षा अधिक व्यापार तोट्याबाबत भारताची काळजी दूर व्हायला हवी. ‘बँकाक पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही स्पष्टपणे योग्य प्रस्ताव मांडला आहे आणि या चर्चेत गंभीरपणे सहभागी आहोत. 

च्पंतप्रधान मोदी हे भारत- आसियान संमेलन तथा आरसीईपी संमेलनात भाग घेण्यासाठी येथे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.
च्पंतप्रधान मोदी यांनी दहा आसियान देश आणि अन्य सहा देश भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, आॅस्ट्रेलिया आणि न्यूझिलँण्डच्या संबंधित प्रतिनिधींसमक्ष यावर भाष्य केले.
च्मोदी ३ नोव्हेंबर रोजी १६ व्या आसियान- भारत शिखर संमेलनात सहभाग घेतील. तर, ४ नोव्हेंबर रोजी आरसीईपी करारावर चर्चा करणाºया देशांच्या तिसºया शिखर बैठकीतही ते भाग घेतील.
 

Web Title: Will India agree on the largest trade deal? by narendra modi in bankok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.