While Indian soldiers are being martyred, they cannot earn money through Chinese goods - Sajjan Jindal | भारतीय जवान शहीद होत असताना चिनी मालाद्वारे पैसे कमावू शकत नाही - सज्जन जिंदाल

भारतीय जवान शहीद होत असताना चिनी मालाद्वारे पैसे कमावू शकत नाही - सज्जन जिंदाल

नवी दिल्ली : चीनमधून होणारी आयात थांबविण्यासाठी उद्योगपतींनी एकत्र यावे, असे आवाहन जेएसडब्ल्यू समूहाचे प्रमुख सज्जन जिंदाल यांनी केले आहे. चीनसोबतच्या सीमेवर जवान शहीद होत असताना चीनचा स्वस्त कच्चा माल वापरून पैसे कमावले जाऊ शकत नाहीत, असे जिंदाल यांनी म्हटले आहे.

सज्जन जिंदाल यांचे पुत्र तथा जेएसडब्ल्यू समूहाच्या सिमेंट व्यवसायाचे प्रमुख पार्थ जिंदाल यांनी गेल्या गुरुवारी समूहाकडून चीनमधून केली जाणारी वार्षिक ४०० दशलक्ष डॉलरची आयात थांबविण्यात येत असल्याची घोषणा केली होती. २४ महिने चीनमधून आयात केली जाणार नसल्याचे पार्थ यांनी म्हटले आहे.

सज्जन जिंदाल यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (एलएसी) तणावामुळे आपले काही मित्र व सहउद्योजक निराश झाले आहेत. कारण त्यांना नफ्यासाठी चीनसोबतचा व्यवसाय महत्त्त्वाचा वाटतो. तथापि, ही परिस्थिती वेगळी आहे. चीनचा स्वस्त माल स्वीकारण्यापेक्षा आपले स्वत:चे देशांतर्गत व्हेंडर्स विकसित करणे महत्त्वाचे आहे. चला, आपण आपल्या उत्पादकांना सहकार्य करूया. आपल्या उत्पादनांबाबत निष्ठा दाखविणे आवश्यक आहे. आपली सशस्त्र दले आणि सरकार यांना समर्थन दिले पाहिजे. चीनविरोधातील संघर्षात आम्ही तुमच्यासोबत
आहोत, हे आपण त्यांना दाखवून दिले पाहिजे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: While Indian soldiers are being martyred, they cannot earn money through Chinese goods - Sajjan Jindal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.