Lokmat Money > बिझनेस न्यूज > म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया

म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड हा गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय आहे. हा केवळ मोठा निधी तयार करण्याचा एक चांगला मार्ग नाही, तर दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्याचं एक प्रभावी साधन देखील आहे. प

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:44 IST2025-06-07T13:32:02+5:302025-06-07T13:44:02+5:30

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड हा गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय आहे. हा केवळ मोठा निधी तयार करण्याचा एक चांगला मार्ग नाही, तर दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्याचं एक प्रभावी साधन देखील आहे. प

What happens to the money if a mutual fund investor dies suddenly? See important information and process | म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया

म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड हा गुंतवणूकदारासाठी गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय आहे. हा केवळ मोठा निधी तयार करण्याचा एक चांगला मार्ग नाही, तर दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्याचं एक प्रभावी साधन देखील आहे. पण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या फंडाचं काय होईल हे तुम्हाला माहित आहे का? या पैशावर दावा कसा करता येईल किंवा तो अडकू शकतो का?

गुंतवणूक आणि नॉमिनेशनचं महत्त्व

म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूकदारांना इतर पर्यायांप्रमाणे नॉमिनी नेमण्याचा पर्याय दिला जातो. जेणेकरून गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यावर नॉमिनीला तो फंड मिळू शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना नॉमिनी ठेवल्यास दाव्याची प्रक्रिया अगदी सोपी होते. म्युच्युअल फंडाची रक्कम मिळवण्याचा अधिकार नॉमिनीला आहे, पण म्युच्युअल फंड गुंतवणूकदारानं नॉमिनीच ठेवलं नसेल तर त्या पैशांचं काय होणार?

'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका

नॉमिनी न केल्यास काय होईल?

जर गुंतवणूकदारांनी नॉमिनी ठेवली नसेल तर त्यांच्या मृत्यूनंतर दाव्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची बनते. मात्र, या परिस्थितीतही पैसे अडकत नाहीत. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडाच्या रकमेवर गुंतवणूकदाराचे कायदेशीर वारसदार दावा करू शकतात.

वारसांना ही कागदपत्रे आवश्यक असतील 

  • मृत्यूचा दाखला,
  • वारसा दाखला किंवा इच्छापत्र, उपलब्ध असल्यास
  • कायदेशीर वारसदाराचे ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • म्युच्युअल फंड फोलिओ नंबर आणि इतर संबंधित माहिती.
     

मृत्यूनंतर पैशाचा दावा करण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम संबंधित म्युच्युअल फंड कंपनीला गुंतवणूकदाराच्या मृत्यूची माहिती द्यावी. हे काम नॉमिनी किंवा वारसदार करू शकतात.
  • नॉमिनीला गुंतवणूकदाराची सर्व आवश्यक कागदपत्रं सादर करावी लागतील. ज्यात मृत्यू प्रमाणपत्र, केवायसी कागदपत्रं आणि फोलिओ नंबरचा समावेश असेल. त्यासोबत क्लेम फॉर्म सादर करावा लागतो. जर गुंतवणूकदारानं नॉमिनीची निवड केली नसेल तर आवश्यक ती सर्व कागदपत्रे वारसांना सादर करावी लागतील. यासाठी वारसा प्रमाणपत्र किंवा गुंतवणूकदाराची इच्छापत्र आवश्यक आहे.
  • म्युच्युअल फंड कंपनी कागदपत्रांची तपासणी करून नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराकडे फंड हस्तांतरित करते.
  • ट्रान्सफरनंतर नॉमिनी किंवा वारसदार फंड रिडीम करू शकतो.
  •  

नॉमिनी आणि विल मधील फरक काय?

बरेच लोक नॉमिनी आणि विल सारखेच मानतात. पण या दोघांमध्ये मोठा फरक आहे. गुंतवणूकदाराने नॉमिनीची नेमणूक केल्यास तो केवळ विश्वस्तांसारखा असेल ज्याला म्युच्युअल फंडाची रक्कम प्राप्त करण्याचा आणि इच्छापत्रानुसार किंवा कायदेशीर वारसदारांनुसार त्याचx वितरण करण्याचा अधिकार असेल. गुंतवणूकदारानx इच्छापत्र केलx असेल तर त्यात नमूद केलेल्या सूचनांनुसार पैसे वितरित केले जातील.

पैसे कधी अडकू शकतात का?

गुंतवणूकदारांच्या मृत्यूनंतर म्युच्युअल फंडात पैसे अडकू शकतात का, असा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात निर्माण होतो. तर याचं उत्तर आहे नाही. योग्य प्रक्रियेचं पालन करून म्युच्युअल फंडात दावा केल्यास नॉमिनी किंवा कायदेशीर वारस योग्य कागदपत्रं आणि प्रक्रियेसह सहजपणे पैशावर दावा करू शकतो. मात्र, गुंतवणूक सुरू करताना नेहमी नॉमिनीचं नाव टाकणं आवश्यक आहे. यामुळे तुमच्या कुटुंबाला भविष्यात संकटापासून वाचवता येईल. जर आपल्याकडे अनेक गुंतवणूक असतील तर इच्छापत्र तयार करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून आपल्या मालमत्तेची आपल्या इच्छेनुसार विभागणी केली जाईल.

Web Title: What happens to the money if a mutual fund investor dies suddenly? See important information and process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.