personal loan : वैयक्तिक कर्ज घेणे आता सामान्य बाब झाली आहे. कुणाला पैशांची गरज भासली तरी त्याला पर्सनल लोन घेण्याचा सल्ला दिला जातो. गेल्या वर्षभरातील आकडेवारी पाहिली तर कोणत्याही इतर कर्जांपेक्षा पर्सनल लोन घेणाऱ्यांची संख्या जास्त दिसते. पण, झटपट मिळते म्हणून वैयक्तीक कर्ज घेऊन नये. लक्षात ठेवा की वैयक्तिक कर्ज हे सर्वात जास्त व्याजदर असलेले कर्ज असते. जेव्हा दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसतो तेव्हाच वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडला पाहिजे. हे सांगण्याचं कारण म्हणजे आता लोक छंद पूर्ण करण्यासाठी देखील पर्सनल लोन घेताना पाहायला मिळत आहे. अशा परिस्थिती असे कर्ज फेडण्यास नंतर जीवावर येते. जर तुम्ही तुमचे वैयक्तिक कर्ज फेडू शकत नसाल तर बँक काय कारवाई करते माहिती आहे का?
कायदेशीर कारवाई
बँकेने वारंवार इशारा देऊनही जेव्हा ग्राहक कर्ज फेडत नाही, तेव्हा बँक कायदेशीर कारवाई करू शकते. या कायदेशीर कारवाईत, ग्राहकाविरुद्ध दिवाणी खटला दाखल करता येतो. अशा प्रकरणांमध्ये, न्यायालय कर्ज न भरलेल्या व्यक्तीला कर्ज परत करण्याचे आदेश देऊ शकते. अनेक प्रकरणांमध्ये, कर्ज वसूल करण्यासाठी न्यायालय अशा लोकांच्या मालमत्तेची जप्ती आणि विक्री करण्याचे आदेश देखील देऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.
कर्ज वसुली एजंटचा त्रास
जेव्हा कर्ज देणाऱ्या बँका एखाद्या व्यक्तीकडून कर्जाची रक्कम वसूल करू शकत नाहीत, तेव्हा ते वसुलीसाठी कर्ज वसुली एजन्सी नियुक्त करू शकतात. कर्ज वसुली एजन्सीचे वसुली एजंट कर्ज न भरणाऱ्या व्यक्तीला त्रास देऊ शकतात. अनेकदा वाहन किंवा मालमत्ता ताब्यात घेतल्याची प्रकरणेही घडली आहे.
वाचा - SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
CIBIL स्कोअर घसरणे
जेव्हा तुम्ही बँकेचे कर्ज फेडू शकत नाही, तेव्हा तुमच्या सीबील स्कोअरवर वाईट परिणाम होतो. यामुळे, भविष्यात तुम्हाला कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळविण्यात खूप अडचणी येतील. एखादी बँक कर्ज देण्यास तयार झाली तर ती खूप जास्त व्याजदर आकारते. त्यामुळे चुकूनही कर्ज फेडण्यास हयगय करू नये.