Lokmat Money > बिझनेस न्यूज > आपण चीनसोबत व्यापार सुरू ठेवला पाहिजे : राजीव बजाज  

आपण चीनसोबत व्यापार सुरू ठेवला पाहिजे : राजीव बजाज  

Rajeev Bajaj : भारताच्या तुलनेत इतर आशियाई देशांमध्ये व्यापार करणं सोपं, बजाज यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 05:46 PM2021-03-01T17:46:51+5:302021-03-01T17:49:55+5:30

Rajeev Bajaj : भारताच्या तुलनेत इतर आशियाई देशांमध्ये व्यापार करणं सोपं, बजाज यांनी व्यक्त केलं मत

We must continue to trade with China says Rajiv Bajaj | आपण चीनसोबत व्यापार सुरू ठेवला पाहिजे : राजीव बजाज  

आपण चीनसोबत व्यापार सुरू ठेवला पाहिजे : राजीव बजाज  

Highlightsभारताच्या तुलनेत इतर आशियाई देशांमध्ये व्यापार करणं सोपं, बजाज यांनी व्यक्त केलं मतगलवान खोऱ्यातील घटनेनंतर देशात चीनचा विरोध वाढला होता.

भारत आणि चीनच्या जवानांदरम्यान गलवान खोऱ्यातील झालेल्या झटापटीनंतर देशात चीनचा विरोध वाढ होता. तसंच अनेकांनी चीनसोबत व्यापार कमी केला जावा अशी मागणीही केली होती. परंतु बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी मात्र चीनसोबत व्यवहार सुरू ठेवण्याची बाजू घेतली असन ज्या ठिकाणी अधिक स्पर्धात्मक किंमतीत वस्तू मिळतात त्या ठिकाणाहून त्याची खरेदी केली गेली पाहिजे, असं ते म्हणाले.
 
एशिया इकॉनॉमिक डायलॉग २०२१ या कार्यक्रमादरम्यान संबोधित करताना राजीव बजाज बोलत होते. परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राद्वारे या चर्चेचं आयोजन करण्यात आलं होते. यावेळी त्यांनी कोणत्याही आशियाई देशांमध्ये भारताच्या तुलनेत व्यापार करणं सोपं असल्याचं मतही व्यक्त केलं. 

"आम्ही एक जागतिक कंपनी आहोत. चीनसोबत व्यापार सुरू ठेवावा असं माझं म्हणणं आहे. कारणं आपण इतक्या मोठ्या देशासोबत व्यापारावर बहिष्कार टाकला तर आपण वेळेनुसार स्वत:ला अपूर्ण पाहू. आपल्या अनुभवाचंही नुकसान होईल," असं बजाज म्हणाले. तसंत सप्लाय चेनसाठी कटिबद्ध असणं महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी याबाबत बोलताना नमूद केलं. 

"मी हे यासाठी सांगत आहे कारण गेल्या वर्षी जून किंवा जुलै महिन्याच्या आसपास आपल्या सरकारनं कोणत्या कारणांमुळे अचानक आयातीवर कठोर बंधनं घातली. विशेषकरून चीनकडून होणाऱ्या आयातीवर. परंतु आता माझ्या डोक्यात ही गोष्ट येते असं करणं म्हणजे तुमचा चेहरा चांगला आणि उत्तम दिसावा यासाठी नाक कापून घेण्यासारखं आहे. एका रात्रीत तुम्ही देशांतर्गत बाजारात कोणत्याही वस्तू निर्माण करण्यासाठी स्त्रोत शोधू शकत नाही," असं बजाज यांनी स्पष्ट केलं. 

भविष्यात आशियात व्यापार करण्याची आशा

"आमची कंपनी भविष्यात एका महत्त्वपूर्ण पद्धतीनं आशियात व्यापार करण्याची आशा करत आहे यासाठी आम्ही काही मॅट्रिक्सची तुलना केली आहे. ही तुलना आम्ही पाच मॅट्रिक्सच्या आधारावर केली आहे. यामध्ये भूमी, श्रम, वीज, लॉजिस्टिक आणि कायदेशीर प्रणालीचा समावेश आहे. आम्ही भारत, व्हिएतनाम, इंडोनेशिया, थायलँड आणि मलेशियासारख्या देशांची संपूर्ण तुलना केली आहे," असं बजाज म्हणाले.
 
"मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की भारताबाबत या विश्लेषणातून समोर येणारे निष्कर्ष अधिक चांगले नाहीत. भारताच्या तुलनेत अन्य आशियाई देशांमध्ये व्यापार करणं सोपं आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Web Title: We must continue to trade with China says Rajiv Bajaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.