Vodafone Idea Reportedly Pushes Back Tariff Hike to Q1 FY22 because of reliance jio new offers airtel | Vodafone-Idea च्या ग्राहकांना तुर्तास दिलासा; दरवाढ टळली; Reliance Jio ठरलं निमित्त

Vodafone-Idea च्या ग्राहकांना तुर्तास दिलासा; दरवाढ टळली; Reliance Jio ठरलं निमित्त

ठळक मुद्दे टॅरिफ दरवाढीची आवश्यकता असल्याचं कंपनीनं यापूर्वी म्हटलं होतंव्होडाफोन आयडियाच्या या निर्णयाचा एअरटेलवरही परिणाम होण्याची शक्यता

व्होडाफोनआयडिया या कंपनीच्या ग्राहकांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. कंपनी एप्रिल-जून तिमाहीच्या अखेरिस आपले दर वाढवण्याची शक्यता आहे. यापूर्वी व्होडाफोनआयडिया ही कंपनी लवकरच आपल्या सेवांचे दर वाढवणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. दरम्यान, यासाठी रिलायन्स जिओ निमित्त ठरल्याचं म्हटलं जात आहे. रिलायन्स जिओनं आपली फीचर फोन युजेस कॉस्ट २५ टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. यानंतर व्होडाफोन आयडियानंदेखील आपल्या सेवांची दरवाढ करण्याचं तुर्तास टाळलं आहे.

"व्होडाफोन-आयडिया या कंपनीचं टॉप मॅनेजमेंट सध्या तात्काळ टॅरिफ वाढवण्यावर विचार करत होतं. परंतु आता काही आणखी महिने थांबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कंपनी आर्थिक वर्ष २०२२ च्या अखेरच्या तिमाहीत  टॅरिफमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे," अशी माहिती एका वरिष्ठ दूरसंचार अधिकाऱ्यानं दिली. इकॉनॉमिक टाईम्सनं याची माहिती असलेल्या काही जाणकारांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. देशातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची कंपनी व्होडाफोन आयडियाचा डिसेंबर २०२० च्या अखेरच्या तिमाहिती प्रति व्यक्ती महसूल हा १२१ रूपये इतका होता. तर दुसरीकडे एअरटेल आणि रिलायन्स जिओसारख्य कंपन्यांचा प्रति व्यक्ती महसूल हा अनुक्रमे १६६ रूपये आणि १५१ रूपये इतक होत. कंपनीनं या तिमाहीच्य अखेरिस टॅरिफ वाढवण्यची योजन तयार केली होती. परंतु तर्तास ही दरवाढ थांबवण्यात आली आहे.

टॅरिफ न वाढण्याची वर्तवली होती शक्यता

व्होडाफोन आयडियाचा हा निर्णय शेअर बाजाराला आश्चर्यचकित करणारा नक्कीच नाही. फेब्रुवारी महिन्यात जिओनं आपले 4G फीचर फो लॉन्च केल्यानंतर जाणकार दूरसंचार कंपन्यांकडून टॅरिफ वाढीच्या शक्यता नाकारत होते. सध्या जिओ फोन्सवर चांगल्या ऑफर्स देण्यात येत आहेत. २४ महिने अनलिमिटेड कॉलिंग आणि दर महिन्याला २ जीबी डेटासह फोन १,९९९ रूपयांना देण्यात येत आहे. तसंच १२ महिन्यांसाठी या सुविधांसह हा फोन १,४९९ रूपयांना देण्यात येतो. 
"कंपनी वेळेवर टॅरिफमध्ये वाढ करेल. तसंच आम्ही कोणाची वाट पाहत नाही. टॅरिफ वाढीची सध्या आवश्यकता आहे," असं व्होडाफोन-आयडियाचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर ठक्कर यांनी फेब्रुवारी महिन्यात एक अॅनालिस्ट कॉलमध्ये सांगितलं होतं. व्होडाफोन-आयडियाचा हा निर्णय निश्चितच एअरटेलवरही परिणाम करेल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Vodafone Idea Reportedly Pushes Back Tariff Hike to Q1 FY22 because of reliance jio new offers airtel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.