Lokmat Money > बिझनेस न्यूज > आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत ब्राझील, कॅनडा, मेक्सिकोसह युरोपियन युनियनवर २५-५० टक्क्यांपर्यंत कर लादला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 15:23 IST2025-07-13T15:21:17+5:302025-07-13T15:23:04+5:30

Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत ब्राझील, कॅनडा, मेक्सिकोसह युरोपियन युनियनवर २५-५० टक्क्यांपर्यंत कर लादला आहे.

Trump Tariff: Where has Trump's 'tariff bomb' exploded so far? See the complete list..; Big update on India | आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब' एकामागून एक अनेक देशांवर फुटत आहे. जपान आणि दक्षिण कोरियासह १४ देशांना पाठवलेल्या टॅरिफ पत्रांपासून त्याची सुरुवात झाली. तेव्हापासून एकएक करत अनेक देशांवर टॅरिफ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी आतापर्यंत ब्राझीलवर सर्वाधिक ५० टक्के (US Tariff On Brazil) कर लादला आहे, तर अलीकडेच त्यांनी मेक्सिको आणि युरोपियन युनियनवर ३० टक्के टॅरिफची घोषणा देखील केली आहे. भारत-अमेरिका दरम्यान सुरू असलेल्या व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर, अद्याप भारतावर कर लादलेला नाही.

ट्रम्प पुन्हा टॅरिफ वाढवू शकतात ?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या सर्वात अलीकडील टॅरिफ घोषणेत मेक्सिको-युरोपियन युनियनचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेने या दोन्ही देशांवर ३० टक्के कर लागू करण्याची घोषणा केली आहे. हा कर पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून, म्हणजेच १ ऑगस्टपासून लागू होईल. विशेष म्हणजे, २७ सदस्यीय युरोपियन युनियन देखील अमेरिकेसोबत व्यापार कराराच्या वाटाघाटी करत आहे, मात्र त्याच्या घोषणेपूर्वीच त्यांच्यावर टॅरिफ बॉम्ब पडला आहे.

या देशांवर २५% ते ५०% पर्यंतचे कर 
युरोपियन युनियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी अमेरिकेच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, युरोपियन युनियन निर्यातीवरील ३०% कर हा अटलांटिकच्या दोन्ही बाजूंच्या व्यवसायांसाठी, ग्राहकांसाठी मोठा धक्का असेल. आतापर्यंत अमेरिकेने सुमारे २५ देशांसाठी नवीन कर जाहीर केले असून, ट्रम्प टॅरिफ पत्रेदेखील पाठवण्यात आली आहेत. या पत्रांमध्ये त्यांच्यावर लादलेल्या कर तसेच त्यामागील कारणांचा उल्लेख आहे. जर आपण सर्व देशांवर लादलेल्या टॅरिफ दरांवर नजर टाकली तर ट्रम्पने ब्राझीलला सर्वात मोठा धक्का दिला आहे.

देश           कर

  • ब्राझील- ५०%
  • म्यानमार- ४०%
  • लाओस- ४०%
  • कंबोडिया- ३६%
  • थायलंड- ३६%
  • बांगलादेश- ३५%
  • सर्बिया- ३५%
  • कॅनडा- ३५%
  • इंडोनेशिया- ३२%
  • मेक्सिको- ३०%
  • युरोपियन युनियन- ३०%
  • दक्षिण आफ्रिका- ३०%
  • बोस्निया आणि हर्जेगोविना- ३०%
  • श्रीलंका- ३०%

भारतावरील कर २०% पेक्षा कमी असू शकतो
ट्रम्प यांनी सर्व देशांची कर यादी शेअर केली असली तरी, भारताचे नाव अद्याप त्यात समाविष्ट केलेले नाही. यामागील कारण म्हणजे, अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार करार (India-US Trade Deal) अद्याप अंतिम झालेला नाही. कॅनडावर ३५ टक्के कर जाहीर करताना ट्रम्प यांनी भारतावरील करबाबत दिलेल्या संकेतांनुसार, भारतावरील अमेरिकेचा कर २० टक्क्यांपेक्षा कमी असू शकतो. ट्रम्प म्हणाले होते की, प्रत्येक देशाला पत्रे पाठवणे आवश्यक नाही, जे व्यापार भागीदार आहेत त्यांच्यावर फक्त १५ ते २० टक्क्यांपर्यंत कर आकारला जाईल.

Web Title: Trump Tariff: Where has Trump's 'tariff bomb' exploded so far? See the complete list..; Big update on India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.