Metal & Aluminium Stocks: स्टील आणि अॅल्युमिनियमवरील अमेरिकेच्या शुल्काला प्रत्युत्तर म्हणून जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) निकषांनुसार अमेरिकेवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्याचा प्रस्ताव भारतानं सोमवारी मांडला. डब्ल्यूटीओनं एका निवेदनात 'या सुरक्षा उपायांमुळे भारतात उत्पादित स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांच्या अमेरिकेच्या आयातीवर ७.६ अब्ज डॉलर्सचा परिणाम होईल,' असं म्हटलं.
अधिक तपशील काय?
निवेदनात म्हटलंय की, भारतानं सवलतींच्या प्रस्तावित स्थगितीमुळे अमेरिकेत उत्पादित उत्पादनांवर समान शुल्क आकारलं जाईल. एप्रिलमध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांनी हे शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतानं डब्ल्यूटीओच्या सुरक्षा करारानुसार अमेरिकेकडे सल्ला मागितला होता. ८ मार्च २०१८ रोजी अमेरिकेनं स्टील आणि अॅल्युमिनियमच्या काही उत्पादनांवर अनुक्रमे २५ टक्के आणि १० टक्के अॅड व्हॅलोरम ड्युटी लादून सुरक्षेचे उपाय लागू केले होते. २३ मार्च २०१८ पासून त्याची अंमलबजावणी झाली, जी जानेवारी २०२० मध्ये वाढवण्यात आली. यावर्षी १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेनं पुन्हा स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांच्या आयातीवरील सुरक्षा नियमांमध्ये सुधारणा केली, जी १२ मार्च २०२५ पासून लागू होईल आणि त्याचा कालावधी अमर्याद आहे. अमेरिकेनं आता २५ टक्के शुल्क लादलं आहे.
फोकसमध्ये हे शेअर्स
या बातमीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मेटल कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आहेत. टाटा स्टीलसह अन्य शेअर्समध्ये आज चढ-उतार दिसून येत आहेत. हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर आज ६४१.९५ रुपयांवर व्यवहार करत आहे. त्यात २ टक्क्यांची घसरण झाली. र जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडचा शेअरही किरकोळ घसरणीसह १,००२.१० रुपयांवर व्यवहार करत आहे. हिंदुस्थान झिंक लिमिटेडचा शेअरही १ टक्क्यांनी घसरून ४३३.१० रुपयांवर व्यवहार करत आहे. याशिवाय वेदांता आणि टाटा स्टीलमध्ये किरकोळ वाढ दिसून येत आहे. सेलचाही शेअ घसरला असून तो ११८.०३ रुपयांवर व्यवहार करत आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)