There is no need to apply separately for interest waiver | मोरॅटोरियमच्या कालावधीमधील व्याजमाफीसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही  

मोरॅटोरियमच्या कालावधीमधील व्याजमाफीसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही  

नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिलेल्या मोरॅटोरियमच्या कालावधी-मधील व्याजमाफीसाठी कर्ज- धारकांना कोणताही वेगळा अर्ज करण्याची गरज नसल्याचे अर्थमंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांच्या खात्यामध्ये परस्पर व्याजाची रक्कम जमा हाेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 
केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे याबाबत माहिती देणारी २० प्रश्नाेत्तरांची मालिका प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामध्ये ही योजना कशा प्रकारे कार्य करणार आहे, ते स्पष्ट करण्यात आले  आहे.  १ मार्च ते ३१ ऑगस्टदरम्यान सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यामधील फरक काढून फरकाची ही रक्कम कर्जदारांना परस्पर परत केली जाणार आहे.

English summary :
There is no need to apply separately for interest waiver

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: There is no need to apply separately for interest waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.