Supertech EV IPO: इलेक्ट्रिक दुचाकी आणि ई-रिक्षा उत्पादक सुपरटेक ईव्हीचा आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीचे शेअर्स बीएसईवर लिस्ट झाले. सुपरटेक ईव्ही आयपीओनं आज, २ जुलै रोजी बाजारात खराब सुरुवात केली. कंपनीचा शेअर ७३.६० रुपयांवर लिस्ट झाला आहे, जो ९२ रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा २०% च्या सुटीसह लिस्ट झाला. बाजारातील कमकुवत सुरुवातीनंतर हा शेअर आणखी पाच टक्क्यांनी घसरून ६९.९२ रुपयांच्या दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
IPO ला उत्तम प्रतिसाद
या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांत हा इश्यू ४.४० पट सब्सक्राइब झाला. ३०.८५ लाख शेअर्सच्या तुलनेत १.३ कोटी शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती. रिटेल इन्व्हेस्टर सेगमेंटला ७.०६ पट, तर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर (एनआयआय) कॅटेगरीमध्ये २.०९ पट सब्सक्राइब मिळालं. सर्वाधिक मागणी क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स (क्यूआयबी) कॅटेगरीमध्ये दिसून आली, जी १.०१ पट सब्सक्राइब झाली.
Home Loan: तुमचा सिबिल चांगला आहे का? तर या ५ सरकारी बँका देतील सर्वात स्वस्त होम लोन
कुठे वापरणार कंपनी हे पैसे?
आयपीओतून मिळणारी रक्कम वर्किग कॅपिटल, कर्जाची परतफेड आणि सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरण्याचा कंपनीचा मानस आहे. सुपरटेक ईव्हीच्या निवेदनानुसार, आयपीओमधून मिळालेल्या निधीचा वापर प्रामुख्यानं आपल्या वर्किंग कॅपिटलच्या गरजा भागविण्यासाठी करण्याची कंपनीची योजना आहे, ज्यासाठी १६.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित निधी काही कर्जांच्या परतफेडीसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल, ज्यामुळे कंपनीचे कामकाज मजबूत होण्यास आणि एकूणच व्यवसाय वाढीस मदत होईल.
सुपरटेक ईव्ही लिमिटेडचं ४४५ वितरकांचं वितरण नेटवर्क आहे आणि दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगण, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आसामसह भारतातील १९ राज्यांमध्ये त्यांची उपस्थिती आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)