Lokmat Money > बिझनेस न्यूज > मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने

मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने

मारन कुटुंबातील (Maran Family) अंतर्गत कलह आता उघडकीस आलाय. माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुकचे खासदार दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांनी त्यांचे मोठे बंधू कलानिधी मारन (Kalanithi Maran) यांना कायदेशीर नोटीस पाठवलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:50 IST2025-06-20T12:49:06+5:302025-06-20T12:50:20+5:30

मारन कुटुंबातील (Maran Family) अंतर्गत कलह आता उघडकीस आलाय. माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुकचे खासदार दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांनी त्यांचे मोठे बंधू कलानिधी मारन (Kalanithi Maran) यांना कायदेशीर नोटीस पाठवलीये.

Sun tv stake Maran family dispute comes to light two brothers legal notice stakeholder | मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने

मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने

मारन कुटुंबातील (Maran Family) अंतर्गत कलह आता उघडकीस आलाय. माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुकचे खासदार दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांनी त्यांचे मोठे बंधू कलानिधी मारन (Kalanithi Maran) यांना कायदेशीर नोटीस पाठवलीये. या नोटिशीत त्यांनी आपल्या मोठ्या भावावर फसवणूक करुन कंपनी हडपल्याचा आरोप केलाय. कलानिधी मारन हे सन टीव्ही नेटवर्कच्या सन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. हा सगळा वाद सन ग्रुपच्या शेअर्सच्या वाटपाचा आहे. सन टीव्ही नेटवर्कचा आकार २४,००० कोटी रुपये आहे.

दयानिधी मारन यांचं म्हणणं काय?

कलानिधी मारन यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये दयानिधी मारन यांनी सन टीव्ही नेटवर्कमधील सप्टेंबर २००३ पूर्वीचं शेयर होल्डिंग स्ट्रक्चर पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. त्यावेळी मारन कुटुंबीय आणि एम. करुणानिधी यांचा समान वाटा होता. त्यांच्या भावानं २००३ मध्ये फसवणुकीनं शेअर्सचं वाटप केलं होतं, असा आरोप दयानिधी मारन यांनी आरोप केलाय. 

दयानिधी मारन यांनी वकील के. सुरेश यांच्यामार्फत आरोप केला आहे की, त्यांच्या भावानं १५ सप्टेंबर २००३ रोजी स्वत:ला १२ लाख शेअर्सचं वाटप केलं होतं. कोणतेही पद्धतशीर मूल्यमापन, भागधारकांची मान्यता आणि मंडळाची संमती न घेता वाटप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. दयानिधी मारन यांचा दावा आहे की, त्यावेळी या शेअर्सची किंमत ३५०० कोटी रुपये होती. कलानिधी यांनी संधीचा फायदा घेत कंपनीच्या ६० टक्के भागावर ताबा मिळवला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सन टीव्ही ही नफा कमावणारी कंपनी आहे. 

नोटिशीनुसार, कलानिधी मारन यांची कंपनीतील भागीदारी ६० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तर इतर भागधारकांचा हिस्सा २० टक्क्यांवर आला आहे.

कोणाकडे किती वाटा?

सन टीव्हीच्या शेअरहोल्डिंगनुसार, कंपनीत देशांतर्गत म्युच्युअल फंडांचा हिस्सा ९.७४ टक्के आहे. कोटक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंडाची २.२ टक्के, क्वांट अॅक्टिव्ह फंडाची ४.७ टक्के आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एक्सपोर्ट्स अँड सर्व्हिसेस फंडाची १.९५ टक्के भागीदारी आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Sun tv stake Maran family dispute comes to light two brothers legal notice stakeholder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.