Lokmat Money > बिझनेस न्यूज > Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?

Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?

Iran Israel War: इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आता आर्थिक नुकसानीकडे वळलं आहे. काय आहे कारण जाणून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:36 IST2025-06-21T15:30:02+5:302025-06-21T15:36:34+5:30

Iran Israel War: इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आता आर्थिक नुकसानीकडे वळलं आहे. काय आहे कारण जाणून घ्या.

Strange theft during Iran Israel war Israeli hackers destroyed cryptocurrency worth Rs 800 crore what is the matter | Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?

Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?

Iran Israel War: इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आता आर्थिक नुकसानीकडे वळलं आहे. प्रिडेटरी स्पॅरो नावाच्या इस्रायली हॅकिंग ग्रुपनं इराणमधील सर्वात मोठे क्रिप्टो एक्स्चेंज नोबिटेक्समधून ९० दशलक्ष डॉलर (सुमारे ८०० कोटी रुपये) चोरल्याचा दावा केलाय. हा गट गोंजेशके दरंदे या नावानंही ओळखला जातो. रिपोर्टनुसार, पैसे ठेवण्याऐवजी त्यांनी ते नष्ट केले. राजकीय संदेश देणं हा त्यांचा उद्देश होता.

फॉर्च्युनच्या म्हणण्यानुसार, इस्रायलशी संबंधित हॅकर्सनी इराणी क्रिप्टो एक्स्चेंजवर हल्ला केला. इराण आणि इस्रायलयांच्यातील तणाव वाढत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. हे सायबर हल्ल्याचं कारण म्हणजे नोबिटेक्स हे दहशतवादाला अर्थसहाय्य आणि निर्बंधांचे उल्लंघन करण्यासाठी एक प्रमुख सरकारी साधन बनलं आहे, असं हॅकर्सनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलंय. हॅकिंगनंतर नोबिटेक्सने आपल्या एक्स अकाऊंटवर बहुतेक करन्सी कोल्ड वॉलेटमध्ये सुरक्षित होती आणि हल्ल्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचं म्हटलं.

NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."

पैसे नष्ट केले

हॅकर्सनं एकही पैसा ठेवला नाही. क्रिप्टो अॅनालिटिक्स फर्म एलिप्टिकच्या रिपोर्टनुसार प्रीडेटरी स्पॅरोनं बिटकॉइन, डॉगकॉइन आणि ९० मिलियन डॉलर्स किमतीच्या १०० हून अधिक वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सी चोरल्या. परंतु हा फंड एनकॅश करण्याऐवजी त्यांनी तो नष्ट केला. क्रिप्टो भाषेत याला 'बर्निंग' म्हणतात. रिपोर्टनुसार, त्यांना राजकीय संदेश पाठवायचा होता.

फॉर्च्यूनच्या मते, ब्लॉकचेन अॅड्रेस किंवा डेटाबेसमधील ठिकाणं जी कोणाकडे किती पैसे आहेत याची नोंद करतात, ते सहसा रँडमली तयार केले जातात. त्यामध्ये संख्या आणि अक्षरांचा क्रम असतो. परंतु या ऑपरेशनसाठी, प्रीडेटरी स्पॅरोनं हॅक केलेले पैसे अशा पत्त्यांवर पाठवले ज्यावर 'F-iRGCTterrorists' हा वाक्यांश होता. IRGC म्हणजे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स, जी इराणी सैन्याची एक शाखा आहे.

Web Title: Strange theft during Iran Israel war Israeli hackers destroyed cryptocurrency worth Rs 800 crore what is the matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.