Lokmat Money >शेअर बाजार > २ वर्षांत रिटर्नच्या नावावर शून्य, यावर्षीही १३% पर्यंत घसरला शेअर; अजूनही आहे का फायद्याची अपेक्षा?

२ वर्षांत रिटर्नच्या नावावर शून्य, यावर्षीही १३% पर्यंत घसरला शेअर; अजूनही आहे का फायद्याची अपेक्षा?

कंपनीचे शेअर्स यंदा आतापर्यंत १३ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअरहोल्डरनं या कंपनीतील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:45 IST2025-06-05T14:44:47+5:302025-06-05T14:45:08+5:30

कंपनीचे शेअर्स यंदा आतापर्यंत १३ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअरहोल्डरनं या कंपनीतील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केली.

zero returns in 2 years itc shares fell by 13 percent this year too Is there still hope for profit know details | २ वर्षांत रिटर्नच्या नावावर शून्य, यावर्षीही १३% पर्यंत घसरला शेअर; अजूनही आहे का फायद्याची अपेक्षा?

२ वर्षांत रिटर्नच्या नावावर शून्य, यावर्षीही १३% पर्यंत घसरला शेअर; अजूनही आहे का फायद्याची अपेक्षा?

ITC Stock Price: आयटीसीचे शेअर्स यंदा आतापर्यंत १३ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअरहोल्डरनं आयटीसीमधील मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री केली, त्यानंतर शेअर्समध्ये आणखी विक्री झाली. आयटीसीनं गेल्या दोन वर्षांत जवळपास नगण्य परतावा दिला आहे. ५ जून २०२३ हा शेअर जवळपास ४१७ रुपयांवर बंद झाला होता.४ जून २०२५ रोजी, हा स्टॉक अजूनही त्याच किंमतीत उपलब्ध आहे. म्हणजेच या शेअरनं २४ महिन्यांत शून्य परतावा दिलाय.

कंपनीचा सर्वात मोठा भागधारक ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोनं (बॅट) आयटीसीमधील आपला २.५ टक्के हिस्सा विकला आहे. या ब्लॉक डीलचं मूल्य सुमारे १२,९०० कोटी रुपये होतं, त्यानंतर बॅटचा हिस्सा २२.९% पर्यंत खाली आला आहे.

शेअर्सचं काय करावं?

AUM Capital इक्विटी रिसर्च हेड राजेश अग्रवाल जिंदाल यांच्या मते, आयटीसी अजूनही दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक मजबूत पर्याय आहे. कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त तर आहेच, शिवाय नियमितपणे चांगला लाभांशही देते. एफएमसीजी आणि सिगारेट सेगमेंटमध्ये त्याची मजबूत पकड कायम आहे आणि मजबूत ब्रँड पोर्टफोलिओ आहे. हॉटेल व्यवसाय वेगळा झाल्यानं कंपनीची आर्थिक स्थिती आणखी सुधारली असल्याचं त्यांनी ईटी नाऊ स्वदेशशी बोलताना सांगितलं. राजेश अग्रवाल यांच्या मते, इतर एफएमसीजी कंपन्यांचे शेअर्स आयटीसीपेक्षा अधिक व्हॅल्यूएशनवर व्यवहार करत आहेत. अशा परिस्थितीत आयटीसीचं मूल्यांकन अजूनही आकर्षक मानलं जाऊ शकतं, असंही ते म्हणाले.

५ वर्षांची कामगिरी कशी?

आयटीसीचा शेअर ४ जून २०२५ रोजी ०.१५ रुपयांनी घसरून ४१६.८० रुपयांवर बंद झाला. गेल्या पाच सत्रात या शेअरमध्ये ०.८३ टक्क्यांची घसरण झाली आहे. आयटीसीचा शेअर एका महिन्यात ४ टक्क्यांहून अधिक घसरला. सहा महिन्यांत त्यात सुमारे ११ टक्क्यांची घसरण झाली आहे. १ वर्षात शेअरनं ०.३९ टक्के सकारात्मक परतावा दिलाय. पाच वर्षांत हा शेअर १०८ टक्क्यांनी वधारलाय. म्हणजेच दीर्घ मुदतीत या शेअरनं गुंतवणूकदारांची निराशा केली नसली, तरी शॉर्ट ते मिड टर्ममध्ये त्याचा परतावा नकारात्मक राहिलाय.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: zero returns in 2 years itc shares fell by 13 percent this year too Is there still hope for profit know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.