Year Ender 2024: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात स्टार्टअप्सची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. खासकरुन शेअर बाजारात या स्टार्टअप्सवर गुंतवणूकदारांची विशेष नजर असते. अनेक स्टार्टअप्सनी शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 2024 मध्येही अनेक स्टार्टअप्सचे IPO आले, ज्यांनी दमदार परतावा दिला. आम्ही या वर्षात आलेल्या 13 स्टार्टअप्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या IPO ने शेअर बाजारात दमदार कामगिरी केली.
2024 मध्ये या 13 स्टार्टअप्स कंपन्यांनी मिळून शेअर बाजारातून 29,247.4 कोटी रुपये उभे केले. यापैकी रु. 14,672.9 कोटी नवीन इश्यू होते, तर रु 14,574.5 कोटी ऑफर फॉर सेल(OFS) होते. इनिशिअल पब्लिक ऑफर (IPO) मध्ये ताज्या इश्यू अंतर्गत जमा झालेला पैसा थेट कंपनीकडे जातो. तर, OFS अंतर्गत जमा झालेला पैसा थेट कंपनीच्या गुंतवणूकदार आणि प्रवर्तकांना जातो. या 13 IPO पैकी 10 मेनबोर्ड आणि 3 SME IPO होते.
2024 च्या स्टार्टअप IPO मध्ये TAC Security, Unicommerce, Mobikwik, TBO Tech, ixigo, Trust Fintech, FirstCry, Menhood, Office, Swiggy, Digit Insurance, Blackbuck आणि Ola Electric यांचा समावेश आहे. 2024 मध्ये स्टार्टअप कंपन्यांमध्ये 11,327.43 कोटी रुपयांचा सर्वात मोठा IPO स्विगीने ऑफर केला होता.
यानंतर Ola इलेक्ट्रिक 6,145.56 कोटी रुपयांच्या IPO सह दुसऱ्या स्थानावर, FirstCry 4,193.73 कोटी रुपयांच्या IPO सह तिसऱ्या स्थानावर, डिजिट इन्शुरन्स 2,614.65 कोटी रुपयांच्या IPO सह चौथ्या स्थानावर आणि TBO टेक 2,614.65 कोटींच्या IPO सह पाचव्या स्थानावर Eus.सर्व मेनबोर्ड स्टार्टअप IPO मध्ये Unicommerce ला सर्वाधिक 168.39 पट, Mobikwik ला 119.38 पट, Office 108.56 पट, ixigo 98.34 पट आणि TBO Tech 86.7 पट सबस्क्रिप्शन मिळाले.
सर्व IPO मध्ये, TAC सिक्युरिटीने सर्वाधिक 173.58 टक्के लिस्टिंग नफा दिला आहे. यानंतर Unicommerce आणि Mobikwik ने अनुक्रमे 117 टक्के आणि 57.71 टक्के लिस्टिंग नफा दिला आहे. याशिवाय Ixigo, Trust Fintech, FirstCry आणि Menhood ने 28 ते 50 टक्के लिस्टिंग नफा दिला आहे.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)