Lokmat Money >शेअर बाजार > २०२४ वर्ष शेअर बाजारासाठी प्रचंड अस्थिर! पण, सलग नवव्या वर्षी बनवला 'हा' विक्रम

२०२४ वर्ष शेअर बाजारासाठी प्रचंड अस्थिर! पण, सलग नवव्या वर्षी बनवला 'हा' विक्रम

Year Ender 2024 : जागतिक मॅक्रो इकॉनॉमिक डेटा आणि भू-राजकीय तणावाचा बाजारावर लक्षणीय परिणाम झाला, ज्यामुळे बाजारात सतत चढ-उतार दिसून आले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 14:21 IST2024-12-29T14:20:48+5:302024-12-29T14:21:24+5:30

Year Ender 2024 : जागतिक मॅक्रो इकॉनॉमिक डेटा आणि भू-राजकीय तणावाचा बाजारावर लक्षणीय परिणाम झाला, ज्यामुळे बाजारात सतत चढ-उतार दिसून आले.

year ender 2024 2024 was very volatile for the stock markets but this record was made for the ninth consecutive year | २०२४ वर्ष शेअर बाजारासाठी प्रचंड अस्थिर! पण, सलग नवव्या वर्षी बनवला 'हा' विक्रम

२०२४ वर्ष शेअर बाजारासाठी प्रचंड अस्थिर! पण, सलग नवव्या वर्षी बनवला 'हा' विक्रम

Year Ender 2024 : २०२४ वर्ष संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सरत्या वर्षाला निरोप देताना लोक अनेक गोष्टींची उजळणी करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी २०२४ वर्ष प्रचंड चढ उताराचे राहिले. भारतीय शेअर बाजारांनी वर्षभरात अनेक वेळा विक्रम केले, तर दुसरीकडे काही वेळा मोठे नुकसानही झाले. मात्र, असे असतानाही देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या जोरावर शेअर बाजारांनी वर्षभरात गुंतवणूकदारांना सकारात्मक परतावा दिला आहे. या वर्षी २७ डिसेंबरपर्यंत बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स ६,४५८.८१ अंकांनी वाढला आहे. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २,०८२ वधारला. बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स या वर्षी २७ सप्टेंबर रोजी ८५,९७८.२५ या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. त्याच दिवशी निफ्टीने २६,२७७.३५ अंकांच्या सार्वकालिक उच्चांकालाही स्पर्श केला होता.

स्मॉल कॅप आणि मिड कॅपचा बोलबाला 
या काळात स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांच्या समभागांनी मोठ्या कंपन्यांपेक्षा चांगली कामगिरी केली. याच कारणामुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांनी 'लार्जकॅप' समभागांपेक्षा गुंतवणूकदारांना जास्त परतावा दिला आहे. निफ्टी आणि सेन्सेक्सची कामगिरी इतर देशांच्या, विशेषत: अमेरिकेच्या बाजारांच्या तुलनेत कमकुवत राहिली आहे. या खराब कामगिरीचे कारण म्हणजे विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) केलेली प्रचंड विक्री. सेन्सेक्स सप्टेंबरमधील सर्वकालीन उच्चांकावरून 8.46 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचवेळी निफ्टी विक्रमी पातळीपासून 9.37 टक्क्यांनी घसरला आहे. केवळ ऑक्टोबरमध्ये सेन्सेक्स ४,९१०.७२ अंकांनी घसरला होता.

त्याच महिन्यात निफ्टी ६.२२ टक्क्यांनी घसरला होता. डिसेंबरमध्ये आतापर्यंत सेन्सेक्स १.३८ टक्क्यांनी घसरला आहे. ऑक्टोबरमध्ये FII ने भारतीय बाजारातून ९४,०१७ कोटी रुपये काढले होते. गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये सेन्सेक्स १८.७३ टक्क्यांनी वाढला होता. तर निफ्टीला २० टक्के नफा झाला होता.

कोविड महामारीनंतरची ही तिसरी मोठी घसरण
वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपन्यांचे मजबूत आर्थिक परिणाम, देशांतर्गत निधी प्रवाहातील वाढ आणि मजबूत मॅक्रो आउटलुक यामुळे निफ्टीने सप्टेंबर २०२४ मध्ये सेन्सेक्स सर्वोच्चा स्थानी गेला होता. पण, गेल्या २ महिन्यांत बाजार सर्वकालीन उच्चांकावरून खाली आला आहे. २०२० मध्ये कोविड-१९ साथीच्या आजारानंतर ही तिसरी मोठी घसरण होती. याचे मुख्य कारण म्हणजे देशांतर्गत आणि जागतिक घटकांमुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) केलेली प्रचंड विक्री. हे वर्ष घटनांनी भरलेले होते. देशातील लोकसभा निवडणुकांव्यतिरिक्त, अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुका या वर्षभरातील प्रमुख घटना होत्या. याशिवाय शेअर बाजारातील दोन प्रमुख भू-राजकीय घडामोडी. इस्रायल-इराण संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धाचाही परिणाम पाहायला मिळाला.

बाजारात सतत चढ-उतार होते
जागतिक मॅक्रो इकॉनॉमिक डेटा आणि भू-राजकीय तणावाचा बाजारावर लक्षणीय परिणाम झाला, ज्यामुळे बाजारात सतत चढ-उतार दिसून आले. जगभरातील अनिश्चितता असूनही, भारतीय बाजारांनी मोठ्या प्रमाणावर दबावात चांगली कामगिरी केली आहे. आणि गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला.

Web Title: year ender 2024 2024 was very volatile for the stock markets but this record was made for the ninth consecutive year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.