Nifty Recovery: भारतीय शेअर बाजारत पुन्हा एकदा उत्साह दिसून येत आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवारी, सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) आपले सर्वकालीन उच्चांक गाठण्याच्या अगदी जवळ पोहोचले. या सकारात्मक वातावरणात, ब्रोकरेज हाऊस पीएल कॅपिटल निफ्टी ५० (Nifty 50) बद्दल उत्साही असून त्यांनी निफ्टीसाठी एक टार्गेट प्राईज दिली आहे. ब्रोकरेजला अपेक्षा आहे की, निफ्टी ५० पुढील १२ महिन्यांत २९,००० अंकांपर्यंत पोहोचेल.
ब्रोकरेजनं काय म्हटलं?
पीएल कॅपिटलने आपल्या 'इंडिया स्ट्रॅटेजी रिपोर्ट' मध्ये म्हटलं आहे की, अनेक तिमाहींमध्ये उत्पन्नात घट झाल्यानंतर बाजार अखेरीस बहुप्रतिक्षित 'अपग्रेड सायकल'मध्ये प्रवेश करू शकतो. त्यांनी यावर जोर दिला की, आर्थिक वर्ष २६, आर्थिक वर्ष २७ आणि आर्थिक वर्ष २८ साठी निफ्टीच्या उत्पन्नातील सुधारणा ५ तिमाहींमध्ये पहिल्यांदाच सकारात्मक राहिल्या आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं डिसेंबरमध्ये व्याजदरात कपात करणं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दरांबद्दल लवचिक भूमिका घेणे आणि रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या वाढत्या शक्यतांनंतर हा सकारात्मक कल दिसून आला आहे.
कमला पसंदचे मालक कोण आणि किती आहे नेटवर्थ? एकेकाळी रस्त्याच्या कडेला विकायचे पान मसाला
गेल्या तीन महिन्यांदरम्यान निफ्टीमध्ये ४% ची वाढ झाली आहे. या वाढीला आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीतील मजबूत कामगिरी, अमेरिकेच्या दरांवरील वाद मिटण्याची आशा आणि जीएसटी सुसूत्रीकरणामुळे सण आणि लग्नसराईच्या काळात देशांतर्गत मागणीत झालेल्या सुधारणांनी बळ दिलंय.
३०,५४८ अंकांपर्यंत कधी जाणार निफ्टी?
ब्रोकरेजनं म्हटलंय की, बँक, एनबीएफसी, कंझ्युमर स्टेपल्स, कंझ्युमर डिस्क्रिशनरी, डिफेन्स आणि बंदरे हे २०२६ साठी त्यांचे पसंतीची क्षेत्रं राहतील. मात्र, ब्रोकरेज आयटी सेवा आणि कमोडिटीजबाबत नकारात्मक भूमिका घेत आहे. ब्रोकरेजच्या मते, तेजीच्या स्थितीत निफ्टीचं मूल्यांकन २०.२x पर्यंत राहू शकतं आणि त्याचं टार्गेट ३०,५४८ अंकांपर्यंत जाऊ शकते. तर, मंदीच्या स्थितीत निफ्टी दीर्घकालीन सरासरीपेक्षा १०% डिस्काउंटवर व्यवहार करू शकतो. याचा अर्थ निफ्टी २६,१८४ अंकांच्या स्तरावर येऊ शकतो.
ब्रोकरेजच्या पोर्टफोलिओमधील नवे शेअर्स
पीएल कॅपिटलनं अपोलो हॉस्पिटल्स, ल्युपिन, एम्बर एंटरप्रायझेस आणि एरिस लाइफसायन्सेस या शेअर्सना आपल्या पोर्टफोलिओ लिस्टमधून वगळलं आहे. याऐवजी, ब्रोकरेजनं अजंता फार्मा, फाइन ऑर्गेनिक इंडस्ट्रीज आणि मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट या शेअर्सचा आपल्या पोर्टफोलिओमध्ये समावेश केला आहे.
