- प्रसाद गो. जोशी
डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहात आरबीआयने कायम ठेवलेले व्याजदर व परकीय वित्तसंस्थांकडून बाजारात सुरू झालेली खरेदी यामुळे बाजारात पुन्हा विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सप्ताहामध्ये जाहीर होणारी चलनवाढीची आकडेवारी आणि परकीय वित्तसंस्थांकडून खरेदी होते की विक्री यावर ठरणार आहे. याशिवाय खनिज तेलाच्या किमती, डॉलरची किंमत याकडेही लक्ष राहणार आहे.
गतसप्ताहामध्ये बाजारामध्ये सकारात्मक वातावरण असल्यामुळे बाजार वाढला. जवळपास सर्वच निर्देशांकांमध्ये वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे.
आगामी सप्ताहात देशातील चलनवाढीची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. त्याचप्रमाणे परकीय वित्तसंस्था कशा प्रकारे खरेदी-विक्री करतात त्यावर बाजाराची हालचाल अवलंबून राहणार आहे.
जगभरात काही ठिकाणी सुरू असलेले युद्ध, त्यामुळे खनिज तेलाच्या दरात वाढ ही उद्योगांच्या वाढीवर परिणाम करणारी आहे. त्याचप्रमाणे डॉलरचे मूल्य वाढत असून, त्याकडेही बाजाराचे लक्ष आहे.
आतापर्यंत ९४३५ कोटींची गुंतवणूक
nगेले दोन महिने सातत्याने विक्रीचा जोर लावलेल्या परकीय वित्तसंस्थांनी डिसेंबर महिन्यात पुन्हा खरेदी सुरू केली, ही बाजाराच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे.
nडिसेंबर महिन्याच्या पहिल्या सप्ताहातच परकीय वित्तसंस्थांनी २४,४५४ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे.
सप्टेंबर महिन्यात या संस्थांनी
नऊ महिन्यांतील सर्वाधिक खरेदी केली होती.
nदोन महिने या संस्थांनी विक्री केली आहे. डिपॉझिटरीकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार परकीय वित्तसंस्थांनी या कॅलेंडर वर्षामध्ये आतापर्यंत ९४३५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
११ कंपन्या
उतरणार बाजारात
nया सप्ताहामध्ये ११ कंपन्या प्रारंभिक शेअर विक्रीसाठी बाजारात उतरत असून याद्वारे १८,५०० कोटी रुपये उभारण्याचा या कंपन्यांचा मानस आहे.
nयापैकी पाच कंपन्या मुख्य प्रवाहातील असून, सहा कंपन्या एसएमई प्रकारामधील आहेत. सन २०२४ मध्ये आतापर्यंत
७८ कंपन्यांनी प्रारंभिक भागविक्रीच्या माध्यमातून
१.४ लाख कोटी रुपये
उभारले आहेत.
nसन २०२३ मध्ये ५७ कंपन्यांनी ४९,४३६ कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे.