Share Market Investment Stocks: गेल्या पाच वर्षात भारतीय शेअर बाजारात काही निवडक कंपन्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स नोंदवला आहे. आकडेवारीनुसार, निफ्टी-५० निर्देशांकातील काही कंपन्यांनी तब्बल ७० टक्क्यांच्या जवळपास वार्षिक परतावा दिला आहे. संरक्षण, आरोग्य आणि ऑटो क्षेत्रात मोठी वाढ दिसते आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांनी दीर्घकालीन स्थिरता दाखवली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक पुढील काही वर्षातही लाभदायक ठरू शकते
निफ्टी-५० मधील टॉप परफॉर्मिंग शेअर्स
एनटीपीसी ३४.०% एलअँडटी ३३.५% इंडिगो ३४.४% हिंदाल्को ३४.७% एसबीआय ३५.६% टाटा स्टील ३५.९% एअरटेल ३७.९% भारत इले. ६९.३% मॅक्स हेल्थ. ६०.६% अदानी इंट. ५२.४% ट्रेंट लिमिटेड ४८.२% महिंद्रा ४१.२% श्रीराम फाय. ३९.७% टाटा मोटर्स ३९.१%
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
शुक्रवारी शेअर बाजारात घसरण
जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण नोंदवली गेली. या तीव्र विक्रीमुळे गुंतवणूकदारांना आणखी मोठा फटका बसला असून, २.०४ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. सेन्सेक्स ४६५.७५ अंकांनी कोसळून ८३,९३८.७१ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी १५५.७५ अंकांनी घसरून २५,७२२.१० च्या पातळीवर स्थिरावला.
शुक्रवारी एकूण ४,३०९ शेअर्समध्ये व्यवहार झाला, त्यापैकी २,३७० शेअर्स घसरणीसह, तर केवळ १,७८४ शेअर्स तेजीसह बंद झाले. जागतिक बाजारातून येणाऱ्या नकारात्मक बातम्यांमुळे पुढील आठवड्यातही अस्थिरता कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
