Lokmat Money >शेअर बाजार > ट्रम्प यांच्या एका निर्णयाने मेटल शेअर्स धडाम! टाटासह या स्टॉक्सचा समावेश; बाजार आणखी किती घसरणार?

ट्रम्प यांच्या एका निर्णयाने मेटल शेअर्स धडाम! टाटासह या स्टॉक्सचा समावेश; बाजार आणखी किती घसरणार?

Stock Market : शेअर बाजाराला ट्रिगर करणाऱ्या अनेक बातम्या आता समोर येत आहेत. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाने मेटल सेक्टरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 10:13 IST2025-02-10T10:13:00+5:302025-02-10T10:13:00+5:30

Stock Market : शेअर बाजाराला ट्रिगर करणाऱ्या अनेक बातम्या आता समोर येत आहेत. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाने मेटल सेक्टरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

weak start of stock market Sensex nifty fell these stocks declined Metal stocks fell after Trump decision | ट्रम्प यांच्या एका निर्णयाने मेटल शेअर्स धडाम! टाटासह या स्टॉक्सचा समावेश; बाजार आणखी किती घसरणार?

ट्रम्प यांच्या एका निर्णयाने मेटल शेअर्स धडाम! टाटासह या स्टॉक्सचा समावेश; बाजार आणखी किती घसरणार?

Stock Market : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात कमजोर झाली. बीएसई सेन्सेक्स २१७.२८ अंकांनी घसरून ७७,६४२.९१ अंकांवर उघडला. तर एनएसई निफ्टी ७५.०० अंकांच्या घसरणीसह २३,४८४.९५ अंकांवर उघडला. आज महिंद्रा, एसबीआय, आयटीसी आणि एअरटेल या कंपन्यांचे शेअर्स वाढत आहेत. त्याच वेळी, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एनटीपीसी आणि एचडीएफसीमध्ये मोठी घसरण आहे. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३० पैकी २५ शेअर्स लाल रंगात व्यवहार करत आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील सर्व स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर २५% शुल्क लावण्याच्या घोषणेचा परिणाम आज भारतासह जगभरातील बाजारपेठांवर दिसून येत आहे. धातूचे शेअर्स मोठ्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. मेटलनंतर फार्मा समभागातही घसरण होत आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाचा परिणाम नाही
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) रेपो दरात ०.२५ टक्के कपात केल्याची घोषणा केल्यानंतरही शेअर बाजारावर काहीच परिणाम झाला नाही. उलट शुक्रवारी बाजार लाल रंगात बंद झाला. बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स १९७.९७ अंकांनी घसरून ७७,८६०.१९ वर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा मानक निर्देशांक निफ्टी देखील ४३.४० अंकांनी घसरला आणि २३,५५९.९५ अंकांवर बंद झाला.

शेअर बाजारावर परिणाम करणाऱ्या बातम्या
अनेक बातम्या आज शेअर बाजारासाठी ट्रिगर म्हणून काम करणार आहेत. टॅरिफ वॉर आणि महागाईच्या भीतीने शुक्रवारी अमेरिकन बाजारात जोरदार विक्री दिसून आली. डाओ ४५० अंकांनी घसरला आणि नॅस्डॅक ४५० अंकांनी घसरून दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. ट्रम्प यांनी टॅरिफ वादात आणखी ते ओतलं आहे.

Web Title: weak start of stock market Sensex nifty fell these stocks declined Metal stocks fell after Trump decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.