भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या मासिक उत्पन्नातील काही भाग वाचवून चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे असं म्हटलं जातं. पैसे गुंतवून तुम्ही केवळ स्वत:साठी निधी जमा करत नाही तर तुमच्या कमाईवर परतावाही मिळतो. आजकाल एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये तुम्ही दर महिन्याला थोडी फार गुंतवणूक करून खूप चांगला फंड जमा करू शकता.
१० लाखांपर्यंतचा फंड कसा तयार करावा
जर तुम्हाला म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करून १० लाख रुपयांपर्यंतचा फंड तयार करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम गुंतवावी लागेल. एसआयपी सरासरी १२ टक्के परतावा देते. हा परतावा कमी किंवा अधिक असू शकतो.
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
जर तुम्ही दर महिन्याला एसआयपीमध्ये १००० रुपये गुंतवले तर तुम्हाला १० लाखांचा फंड तयार करण्यासाठी २१ वर्षे लागतील. यावेळी तुम्ही गुंतवलेली रक्कम २.५ लाख रुपये असेल.
जर तुम्ही दर महिन्याला एसआयपीमध्ये २००० रुपये गुंतवले तर तुम्हाला १० लाखांचा फंड तयार करण्यासाठी १६ वर्षे लागतील. यावेळी तुम्ही गुंतवलेली रक्कम ३.८४ लाख रुपये असेल.
जर तुम्ही दर महिन्याला एसआयपीमध्ये ५००० रुपये गुंतवले तर तुम्हाला १० लाखांचा फंड तयार करण्यासाठी १० वर्षे लागतील. या वेळी तुम्ही गुंतवलेली रक्कम ६ लाख रुपये असेल.
या गोष्टी लक्षात ठेवा
म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये तुम्हाला किती परतावा मिळेल, हेही बाजारावर अवलंबून असतं. पण दीर्घकाळ नियमित गुंतवणूक केल्यास बाजारातील चढउतारांचा परिणाम सरासरी होतो, ज्यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळतो.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)