Lokmat Money >शेअर बाजार > एकेकाळी 'या' शेअरनं पाडलेला पैशांचा पाऊस, आता किंमत अर्धीही नाही; ९ महिन्यांत ठरला डोकेदुखी

एकेकाळी 'या' शेअरनं पाडलेला पैशांचा पाऊस, आता किंमत अर्धीही नाही; ९ महिन्यांत ठरला डोकेदुखी

Waaree Renewable Technology Share Price: असे अनेक शेअर्स आहेत जे एकेकाळी गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव करत होते. पण आता ते गुंतवणूकदारांसाठी एक डोकेदुखी ठरत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 10:26 IST2025-02-14T10:23:41+5:302025-02-14T10:26:34+5:30

Waaree Renewable Technology Share Price: असे अनेक शेअर्स आहेत जे एकेकाळी गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव करत होते. पण आता ते गुंतवणूकदारांसाठी एक डोकेदुखी ठरत आहेत.

Waaree Renewable Technology stock once made money now its price is not even half huge loss in 9 months | एकेकाळी 'या' शेअरनं पाडलेला पैशांचा पाऊस, आता किंमत अर्धीही नाही; ९ महिन्यांत ठरला डोकेदुखी

एकेकाळी 'या' शेअरनं पाडलेला पैशांचा पाऊस, आता किंमत अर्धीही नाही; ९ महिन्यांत ठरला डोकेदुखी

Waaree Renewable Technology Share Price: गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारात घसरण होत आहे. गुरुवारी दुपारी शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये होता , पण बाजार बंद होईपर्यंत तो रेड झोनमध्ये आला. त्याचबरोबर या घसरणीचा फटका अनेक शेअर्सना बसला. असे अनेक शेअर्स आहेत जे एकेकाळी गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव करत होते. पण आता ते गुंतवणूकदारांसाठी एक डोकेदुखी ठरत आहेत.

यातील एक शेअर वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आहे. एकेकाळी गुंतवणूकदारांवर या शेअरनं पैशांचा वर्षाव केला होता. एका वर्षात त्याचा परतावा १४०० टक्क्यांहून अधिक झाला होता. पण आता गेल्या काही काळापासून त्यात लक्षणीय घट झाली आहे. त्यातही गुरुवारी यात घसरण झाली. हा शेअर ०.१८ टक्क्यांच्या घसरणीसह ८७६.५५ रुपयांवर बंद झाला.

वर्षभरात १४०० टक्क्यांहून अधिक परतावा

या शेअरनं वर्षभरात गुंतवणूकदारांना १४०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मे २०२३ च्या सुरुवातीला याची किंमत जवळपास २०० रुपये होती. मे २०२४ मध्ये तो ३०३७ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. अशा तऱ्हेनं वर्षभरात गुंतवणूकदारांना १४१८ टक्के परतावा दिला. म्हणजे एक लाख रुपयांचं मूल्य १५ लाखांहून अधिक झालं होतं.

किती घसरला हा शेअर?

आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपासून या शेअरमुळे गुंतवणूकदारांचे मोठं नुकसान झालंय. त्यानंतर ९ महिन्यांत त्यात ७० टक्क्यांहून अधिक घसरण झाली. म्हणजे त्याची किंमत अर्ध्यापेक्षाही कमी झालीये. जर एखाद्या व्यक्तीने मे २०२४ मध्ये गुंतवणूक केली असती, तर त्याला ७० टक्क्यांपर्यंत नुकसान झालं असतं. म्हणजेच त्याच्या १ लाखाचं मूल्य ३० हजार झालं असतं.

६ महिन्यांत ४० टक्क्यांहून अधिक नुकसान

६ महिन्यांतही गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय. ६ महिन्यांपूर्वी याची किंमत १५०० रुपयांच्या आसपास होती. तेव्हापासून या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांचं ४० टक्क्यांहून अधिक नुकसान केलंय. यामध्ये काही प्रमाणात मध्ये तेजी दिसून आली असली तरी तोटा भरून काढता आला नाही.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Waaree Renewable Technology stock once made money now its price is not even half huge loss in 9 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.