Vodafone Idea Ltd Stock Price : सोमवारी शेअर बाजारात चढ उतार दिसून आले. निफ्टीनं २३८०० ची पातळी गाठण्याचा प्रयत्न केला असला तरी बाजारात केवळ साइडवे मूव्ह्स पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, स्टॉक स्पेसिफिक अॅक्शन पाहायला मिळत आहे. काही वृत्तांचा प्रभाव पेनी शेअर्सवरही दिसून येत आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या (Vodafone Idea Ltd) शेअरमध्ये सोमवारी ६ टक्क्यांची वाढ दिसून आली. व्होडाफोन आयडिया लिमिटेडचा शेअर सोमवारी कामकाजाच्या सुरुवातीला ७.९९ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. या कंपनीचं मार्केट कॅप ५४.८५ हजार कोटी रुपये आहे.
२०२१ च्या दूरसंचार सुधारणांपूर्वी झालेल्या स्पेक्ट्रम लिलावासाठी दूरसंचार विभागाने बँक गॅरंटीची अट माफ केल्याच्या वृत्तानंतर व्होडाफोन आयडियाच्या (Vi) शेअर्समध्ये ही ७ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. व्होडाफोन आयडियानं २८ डिसेंबर रोजीच्या एका निवेदनात सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. तसंच दूरसंचार उद्योगाला सरकारनं दिलेल्या दिलास्यामुळे भारतात ४जी आणि ५जी गुंतवणूकीला चालना मिळणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं.
मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग
व्होडाफोन आयडियानं सोमवारी मोठ्या प्रमाणात व्यवहार करण्यास सुरुवात केली. सकाळपर्यंत एनएसईवर ३५.४ कोटी तर बीएसईवर ४.६६ कोटी शेअर्सचे व्यवहार झाले. व्होडाफोन आयडिया हा किरकोळ गुंतवणूकदारांचा आवडता शेअर मानला जातो. त्यात २१.९० टक्के पब्लिक शेअर्सहोल्डिंग आहे. प्रवर्तकांचा हिस्सा ३७.२० टक्के, तर डीआयआयचा हिस्सा २८ टक्के आहे.
व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सवर जून महिन्यापासून दबाव आहे. २८ जून रोजी ५२ आठवड्यांच्या उच्चांकी १९.१५ रुपयांवरून ६५.५ टक्क्यांहून अधिक घसरून २२ नोव्हेंबरला ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ६.६० रुपयांवर आला. हा शेअर सतत चर्चेत असणारा शेअर आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)