Vedanta Share Price: खाण क्षेत्रातील दिग्गज कंपनी वेदांताचे शेअर्स बुधवारी, १४ जानेवारी रोजीही मजबुतीसह व्यवहार करत होते. सलग चौथ्या व्यापारी सत्रात या शेअर्समध्ये तेजी नोंदवण्यात आली. शेअरच्या किमतीत ६.६% ची वाढ झाली असून तो ६७९.४५ रुपये प्रति शेअर या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. अशा प्रकारे गेल्या चार दिवसांत एकूण १३% वाढ झाली आहे.
मेटल स्टॉक्समध्येही तेजीचं वातावरण
वेदांता व्यतिरिक्त, इतर प्रमुख धातू कंपन्यांचे शेअर्स देखील वधारले आहेत. बेस मेटल्स आणि मौल्यवान धातू अशा दोन्हीच्या किमतीतील मजबुती हे याचं मुख्य कारण आहे. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यावर गुन्हेगारी खटला चालवण्याच्या शक्यतेनं मध्यवर्ती बँकेच्या स्वातंत्र्याबाबत पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
टॅरिफचा हत्यार म्हणून वापर करणारे ट्रम्प आपल्याच देशात अडकले, पॉवेल यांच्यावरील तपास पडला भारी
जागतिक घडामोडींचा परिणाम
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना ताब्यात घेणं, ग्रीनलँडवर कब्जा करण्याची पुन्हा दिलेली धमकी आणि इराणमधील हिंसक निदर्शनं यांसारख्या जागतिक घटनांमुळेही या रॅलीला पाठबळ मिळालं. या घडामोडींनी, शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक जरी दबावाखाली असला तरी धातू क्षेत्रातील शेअर्सना उच्च स्तरावर राखण्यास मदत केली.
शेअर ८०६ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता
ब्रोकरेज फर्म 'नुवामा'ने वेदांतावर आपले 'बाय' (Buy) रेटिंग कायम ठेवलं असून, प्राइस टारगेट १८% ने वाढवून पूर्वीच्या ६८६ रुपयांवरून ८०६ रुपये केलं आहे. हा स्टॉक ट्रॅक करणाऱ्या १४ विश्लेषकांपैकी नुवामाचं टार्गेट सर्वात जास्त आहे. सुधारित लक्ष्याचा अर्थ असा की, मंगळवारच्या क्लोजिंग लेव्हलपासून यात २७% वाढीची क्षमता आहे. वेदांताला ट्रॅक करणाऱ्या १४ विश्लेषकांपैकी एकानेही या स्टॉकला 'सेल' (Sell) रेटिंग दिलेलं नाही. त्यापैकी १० जणांनी 'बाय' रेटिंग दिलं आहे, तर उर्वरित चौघांनी 'होल्ड' करण्याचा सल्ला दिला आहे.
टार्गेट प्राईज का वाढवली?
वाढत्या धातूंच्या किमतींव्यतिरिक्त, कंपनीच्या सुरू असलेल्या 'डिमर्जर' प्रक्रियेमुळे व्हॅल्यू अनब्लॉकिंग होण्याची शक्यता, हे टार्गेट वाढवण्याचं मुख्य आधार असल्याचं नुवामानं म्हटलंय. सर्व बिझनेस सेगमेंटच्या व्हॅल्युएशनमधील वाढ यात समाविष्ट करण्यात आली आहे. वाढलेल्या कमोडिटीच्या किमती आणि उत्पादन प्रमाणात केलेलं समायोजन यामुळे टार्गेट प्राईज ८०६ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या किमतीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
